अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ नूतन सहस्रकातील व्यवस्थापन

ळाची विभागणी प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या सोयीनुसार करीत असतो. प्रत्येक कालखंडात घडलेल्या घटनांचे विश्लेषण करण्यासाठी अशी विभागणी केली जाते. इंग्रजी कालगणनेनुुसार सध्या आपण तिसऱ्या सहस्रकात प्रवेश केला आहे. या सहस्रकातील व्यवस्थापनाचं स्वरूपं कसं असेल, याची उत्सूकता सर्वांनाच आहे. मात्र नूतन सहस्रक काही एकदम उगवलेलं नाही. त्याला पहिल्या व दुसन्या सहस्त्रकाची पाश्र्वभूमी आहे.या दोन सहस्त्रकांमध्ये घडलेल्या सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींंमधून तिसच्या सहस्रकाचा पाया घातला गेला. तेव्हा नूूतन सहस्रकातील व्यवस्थापन शैैलीसंबंंधी विवेचन करताना पहिल्या दोन सहस्रकांचा परामर्ष घेणे आवश्यक आहे.

 पहिल्या सहस्रकापासून म्हणजेच सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी मानवी संस्कृती सुसंबध्द व सविस्तर इतिहास लिहून अगर नोंदवून ठेवण्याची पध्दत सुरू झाली.या पहिल्या सहस्रकापूर्वी जगात रोम, चिनी, इजिप्शियन व भारतीय अशा चार संस्कृती अस्तित्वात होत्या. त्यांचं संपूर्ण जगावर राजकीय आणि तात्विक वर्चस्व होतंं.
पहिले सहस्रक :
 पहिल्या सहस्रकातं युरोप आणि पश्चिम आशियामध्ये पारंपरिक रोमन व इजिप्शीयन संस्कृती ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मानी गिळून टाकले.तर भारतीय आणि चिनी संस्कृतीसमोर बौध्द धर्म व जैन धर्म यांनी आव्हान उभं केलं.तथापि ,भारतात सनातन हिंदू धर्मानं बौध्द आणि जैन तत्वज्ञानांना आपल्यात सामावून घेतलं. बौध्द धर्म संस्थापक भगवान गौतम बुध्द हिंदूंंनी भगवान विष्णूचा नववा अवतार मानलंं. यामुळे बौध्द तत्त्वज्ञान हा बृहत हिंदू तत्त्वज्ञानाचा एक भाग बनला. साहजिकच भारतीय उपखंडात बौध्द तत्त्वज्ञानाचा स्वतंत्र प्रभाव जवळ जवळ नाहीसा झाला.
 भारतात जन्माला आलेला बौध्द धर्म चीनमध्ये पसरला. तिथल्या' कन्फ्युशियस व ताओ तत्त्वज्ञानाशी त्याचा विशेष संघर्ष न होता संयोग झाला. मात्र,युरोप व पश्चिम आशियात खिश्चन व इस्लाम यांच्यात याच सहस्रकाच्या उत्तरार्धात रक्तरंजित लढाया झाल्या. इ.स. ६५० पर्यंत मध्यपूर्वेवर इस्लामी तर युरोपवर खिश्चन धर्मानं कब्जा मिळवला दोन्ही धर्मानी ज्यू धर्मावर असंख्य आक्रमणं केली आणि दुसच्या सहस्त्रकाच्या उत्तरार्धापर्यंत ज्यूना बचावात्मक धोरण स्वीकारण्यास भाग पाडले.
दुसरं सहस्त्रक :
 याही सहस्त्रकात इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मीयांच्या लढाया चालूच राहिल्या. भारतात इस्लामचा प्रवेश हे या सहस्रकाचे आणखी एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य. मोगलांच्या काळात जवळपास पूर्ण भारत इस्लामी राजवटीच्या ताब्यात गेला. हे वर्चस्व अखेरीस पाश्चिमात्य शक्तींनी मोडून काढलं व सहस्त्रकाचा शेवटच्या शतकात ब्रिटिशांनी भारतावर एक हाती राजकीय सत्ता स्थापन केली.
 या सहस्त्रकाच्या सुरुवातीला युरोप व पश्चिम आशिया ख्रिश्चन व इस्लामी जणू वाटून घेतला होता. कधी शांतता तर कधी संघर्ष असे त्यांच्यातील संबंध होते. मात्र या सहस्रकातील शेवटच्या ३०० वर्षांत युरोपात वैज्ञानिक क्रांती झाली. यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा विकास होऊन आधुनिक शास्त्र विकसित झाली. त्यामुळे इस्लामला मागं सारून ख्रिश्चन संस्कृती जगभर आघाडीवर आली. हा पुढावा दुसऱ्या सह्स्त्रकाच्या अखेरपर्यंत कायम राहिला.
 याच सहखकाच्या उत्तरार्धात झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे मानवी संस्कृतीची दिशा बदलली. शेकडो वर्षे एक ‘सामाजिक प्राणी' म्हणून जगणारा मानव औद्योगिक क्राांंतीमुळे ‘आर्थिक प्राणी’ बनला. त्यामुळे धार्मिक किंवा सामाजिक वर्चस्वाखाली होणारी युध्द आणि राजकारणे थांबली; आर्थिक वर्चस्वासाठी झगडे सुरू झाले. यात भाडवलशाहीविरुध्द साम्यवाद हा संघर्ष क्रांतिकारक ठरला. औद्योगिक क्रांतीपूर्वी जग धर्मानी आपसांत विभागून घेतलं होतं. औद्योगिक क्रांतीनंतर ते भांडवलशाही आणि साम्यवाद असं विभागलं. ही विभागणी साधारण ७० वर्षे टिकली.
 दुसऱ्या सहस्रकाच्या अखेरीस भांडवलशाहीनं साम्यवादावर निर्णायक मात केली. अवघ्या दशकापूर्वी स्वत:ला अभिमानानं साम्यवादी म्हणवून घेणारी आणि भांडवलशाहीला हिणवणारी राष्ट्रंं भांडवलशाहीचा बिनदिक्कत स्वीकार करून मोकळी झाली‘काळाची गरज अशा शब्दांत या परिवर्तनाचं समर्थनही केले जाऊ लागलंं.
 भांडवलशाही हे लवचिक व प्रवाही तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे अन्य तत्त्वज्ञानांतील सोयीच्या बाबींचा स्वीकार करून तिनं स्वत:तील दोषांची तीव्रता कमी केली. उदाहरणार्थ,कामगार व गरीब वर्गाचं शोषण हा भांडवलशाहीचा सर्वात कच्चा दुवा आहे. तथापि, कल्याणकारी राज्य’ या संकल्पनेचा स्वीकार करून यां वर्गाच्या शोषणावर लगाम घालण्यात भांडवलशाही राष्ट्रे यशस्वी ठरली.  भांडवलशाहीचा सांधा लोकशाहीशी जुळतो. साम्यवाद मात्र राजकीय हुकूमशाहीशिवाय
अंमलात येऊ शकत नाही. सध्याच्या आधुनिक मानवी संस्कृतीत हुकूमशाही ही रानटी व मध्ययुगीन संकल्पना मानली जाते.साहजिकच अशा कालबाह्य राज्यपध्दतीत आसरा शोधणारा साम्यवाद कोणालाच नकोसा झाला आहे.हुकुमशाही अधिक साम्यवाद या मिश्रणापेक्षा लोकशाही अधिक भांडवलशाही हे मिश्रण आधुनिक मानवाला जास्त स्वीकारार्ह वाटतं. साम्यवाद अधिक लोकशाही असं मिश्रण असूच शकत नाही.
 भांडवलशाहीत ‘उद्योजकता' या संकल्पनेचा विकास होत गेला. त्यामुळे असंख्य नवे उत्पादन व सेवाव्यवसाय निर्माण झाले.विविध उद्योजकांमधील मुक्त स्पर्धेमुळे उत्पादकता,उत्पादनांची गुणवत्ता आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन मिळालं.याचा परिणाम म्हणून आर्थिक विकास वेगाने होत गेला. बहुतेकांचं जीवनमान सुधारल.
 दुसऱ्या सहस्स्त्राकानं पुरुष विरुध्द स्त्री या आणखी एका विश्वरूपी सामाजिक संघर्षाचा निकाल लावला.नंतर शिकार करणं, शेती व लढाया यांचे प्रमाण वाढले. ही कामं शारीरिक शक्तीच्या जोरावर करावी लागत असल्याने महिला मागे पडल्या व पुरुषाचं प्रथम कुटुंबावर व नंतर समाजावर वर्चस्व वाढलं. पण दुसऱ्या सहस्रकाच्या उत्तरार्धात पुन्हा आपल्या कोशातून बाहेर पडू लागल्या असून जवळजवळ सर्वच क्षेत्रांत पुरुषाच्या बरोबरीने उभ्या आहेत. यंत्रयुग व संगणकयुग अवतरल्यामुळे उत्पादनासाठी शारीरिक शक्तीवर अवलंबून राहावे लागत नाही. असा पंक्तीप्रपंचत्यामुळे पुरुषांची कामं वेगळी आणि महिलांची वेगळी असा पंक्तीप्रपंच बाजूला पदाला आहे.स्त्री शक्ती जागृत झाली असून ती समानतेची मागणी करीत आहे आणि ती अमान्य अशक्य आहे.
 अशा पध्दतीनं स्त्री-पुरुष समानता, भांडवलशाही आणि लोकशाही ही त्रिसुती हाती घेऊन आपण तिसर्या सहस्रकात नुकताच प्रवेश केला आहेया त्रिसूतत्रीला विरोध करणाच्या शक्ती अजूनही अस्तित्वात आहेत. तथापि, त्यांचा बीमोड या सर्व पहिल्या काही दशकांत होणार आहे.
 या शतकातील औद्योगिक व इतर क्षेत्रातील व्यवस्थापनावरही या त्रिसूत्रीचा प्रभाव पड़णं अनिवार्य आहे. या पाश्र्वभूमीवर सहस्रकातील व्यवस्थापनासमोरचाी आवाहने कोणती आहेत व त्यांचा सामना कसा करावा लागेल याचा विचार पुढील लेखात करूंं.