अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ समाजरचनेचा विपरीत परिणाम

लणाच्या कासवाला हात लावला तरी ते चटकन थांबतं.आपलं पाय व डोकं कवचात ओढून घेतं.धोका टळेपर्यंत त्याच स्थितीत राहतं. शत्रुवर प्रतिआक्रमण करण्यापेक्षा स्वतःची हालचाल थांबवणंं, आपल्यापासून कोणताही धोका नाही शत्रूच्याा लक्षात आणून देणंं व अशा मार्गाने स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करणंं याला कासवनीती असे म्हणतात.

 एकंदरीत कासवाची हालचाल मंद, संथ व सौम्य असते.आपलं भक्ष्य पकडतानाही वाजवीपेक्षा जास्त उत्साह दाखवत नाही. कासवाचं आयुष्य पुष्कळ असलं तरी जीवन फारसं सक्रिय असत नाही. धोक्याची जाणीव झाल्यावर निःश्चेष्ट पडून राहण्याच्या त्याच्या कृतीमुळे कित्येकदा शत्रुची फसगत होते.हे आपलं भक्ष्य नसून एखादा निर्जीव पदार्थ असावा असं वाटून तो त्याच्या वाटेला जात नाही. अशा ‘अहिंसक’ मार्गाने स्वत:ची सुरक्षितता सुनिश्चित करणंं हे कासवाचंं धोरण असतं.
 आकाशात भरारी मारणारा गरुड नेमका याच्या उलट असतो. विषारी सापासारख्या प्रबळ शठूलाही आपले भक्ष्य बनवण्यास तो मागेपुढे पाहत नाही. गरुडाचंं जीवन म्हणजे सळसळत्या उत्साहाचं प्रतीक आहे. शत्रूचा नायनाट करण्यासाठी आपण त्याच्यावर तुटून पडणं, स्वतःचं स्वामित्व राखण्यासाठी वेळप्रसंगी धोका पत्करणं व प्रतिस्पर्ध्याना नामोहरम करण्यासाठी स्वतःच्या ताकदीचा पुरेपूर वापर करणंं, ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच त्याला आकाशाचा सम्राट असे म्हणतात.
 काेेणत्याही समाजाचा विकास हा एक तर कासवाच्या किंवा गरुडाच्या पध्दतीने होतंं आणि या विकास पध्दतीचे प्रतिबिंब त्या-त्या समाजाच्या उद्योगधंदे चालाविण्याच्या पध्दतीत दिसून येतंं.भारतापुरतंं बोलायचं झाल्यास भारतीय समाज आणि भारतीयउद्योग कासव पध्दतीने चालत असल्याचे दिसतं.
{{gap}खरे पाहता भारताचा इसवीसनपूर्व इतिहास लक्षात घेता अशी परिस्थिती नव्हती.तीन हजार वर्षांपूर्वीचा काळ भारताचं सुवर्णयुग म्हणून ओळखला जात होता. भारतीय उत्पादनं,तंत्रज्ञान, व्यापार, औषधपध्दती सध्याच्या भारताच्या सीमा ओलांडून अन्य देशांवर पडत होता. दक्षिण आशिया व दक्षिणपूर्व आशिया येथे भारतीय संस्कृती नांदत होती याचे पुरावे या भागांमध्ये जागोजागी आढळतात. (अगदी लॅटिन अमेरिकेपर्यंत भारतीय संस्कृतीचा प्रभाव होता असे अनेक पुरावे सापडलेे आहेत.)भारतीय तंत्रज्ञ वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंची व मिश्र धातूंची निर्मिती, वनस्पतिजन्य व खनिज पदार्थजन्य औषधे, अतितलम वस्रप्रावरणं अशा वस्तू भारताखेरीज इतरत्न नव्हत्या व सातासमुद्रापलीकडे जाऊन त्यांचा व्यापार करून व्यापारी वर्गाने भारताला जगातला सर्वात वैभवी देश बनविले होते. धर्म, तत्त्वज्ञान व रणांंगणावरील पराक्रम यातही भारताचा हात धरणारा कुणी नव्हता. भारत हा एक 'गरुड' होता.
 त्यानंतर परिस्थिती बदलली. आक्रमक, विजिगिषुु व परिवर्तनशील मनोवृत्तीवर स्थिरताप्रिय व आत्मकेंद्री मनोवृत्तीने विजय मिळविला. सतत पडणारे दुष्काळ व सरस्वती नदीचं लुप्त होणंं या कारणांमुळे एकेकाळचा उन्नत भारतीय समाज देशोधडीला लागला, असं इतिहासकारांचंं म्हणणंं आहे.काहीही असलं तरी त्याचा परिणााम व्हायचा तोच झाला. भारतीय समाजाने शहरी समाज व्यवस्था व व्यापारी अर्थव्यवस्था सोडून ग्रामीण समाजव्यवस्था व शेतीप्रधान अर्थव्यवस्था स्वीकारली.अत्यंत बंदिस्त अशी जातिव्यवस्था निर्माण झाली. मुक्त व्यापाराच्या मार्गाने धन मिळवून श्रीमंत बनण्यापेक्षा परमेश्वराची आराधना करून पुण्यसंचय करणंं जास्त प्रतिष्ठेचं मानल जाऊ लागलं. समुद्र प्रवास सोडाच, पण समुद्राला पांय लावणंही महापाप समजलं जाऊ लागलं. पूर्वी तत्त्वज्ञानासारख्या जटिल विषयांचा अभ्यास करणाऱ्या महिलांना घराच्या चार भिंतीत कोंडून त्यांच्यावर चूल आणि मूल या दोनच जबाबदान्या टाकण्यात आल्या. त्यामुळे समाजाची अर्धी बाजू जणू लुळी पडली.
 याचा परिणाम म्हणून तंत्रज्ञान, संशोधन व व्यापार थंडावला. संपत्तीत होणारी वाढ आटली. भारतीय कर्तृत्वाच्या सीमा आक्रसू लागल्या. सांपत्तिक स्थिती खालावली तशी संरक्षण व्यवस्थाही कमजोर होऊ लागली. याचा फायदा घेवून परकीय आक्रमणांंना ऊत आला. त्याचा लढून प्रतिकार करण्यापेक्षा जंगलात सुरक्षित ठिकाणी पळून जाणंं सोयीचं मानले जाऊ लागलं.परिणामी भारतभूमी परकियांच्या तावडीत गेली.
 या संस्कतीचे काही फायदेही होते. बेकारी अजिबात नव्हती, कारण मुलगा जन्माला येताच त्याने मोठेपणी कोणतं काम करायचं हे त्याच्या जातीवरून अगोदरच ठरत असे. सर्व उद्योग व्यवसायांची विभागणी जातींमध्ये झाली होती व ती बंधनं तोडणंंधर्मबाह्य मानले जात असे. यामुळे स्पर्धेचा धोका पूर्णपणे समाप्त झाला होता.खेड्यांतले वाद खेड्यांतच पंचायत पद्धतीद्वारा मिटविण्यात येत. देशावर सत्ता कुणाचीहीअसो, खेड्यातील या स्थितीत कोणताही फरक पडत नसे.
 महाकवी तुलसीदासाने म्हटलं आहे, ‘कोहू को राजा, हमै का हानी' (राजा कोणीही असो, आम्हाला काय त्याचे) ही अवस्था शतकानुशतके कोणताही बदल न होता चालत राहिली. समाजव्यवस्था कासवाप्रमाणे दीर्घायुषी पण निष्क्रिय बनली. याच सुमारास पाश्चिमात्य देश कासवाचे गरुड बनले होते.
 गेली सुमारे दीड हजार वर्षे आपण स्वीकारलेल्या या कासव परंपरेमुळे समाजाची काही अंगभूत वैशिष्ट्ये बनली आहेत. ती जुन्या काळात कदाचित सोयीची असतील,पण सध्याच्या उद्योगप्रधान व अर्थप्रधान काळात जाचक नव्हे तर घातक ठरत आहेत.हे दोष पुढीलप्रमाणे-
 १.कामांची जातीनिहाय विभागणी व एका जातीचं काम दुसच्या जातीने करायचं नाही हा सर्वमान्य नियम.
 २.पूर्वजांनी घालून दिलेले नियम व पध्दती जशाच्या तशा पाळणंं. त्याचं पुनर्मूल्यांकन न करणं.म्हणजेच ज्ञानापेक्षा व्यक्तीला महत्व.
 ३.संशोधन करून नवं तंत्रज्ञान, बाजार पध्दती शोधण्यापेक्षा आहे ते राखणंं व धोका न पत्करता सुरक्षित जगण्याकडे कल.
 ४.पारंपरिक ज्ञान हेच श्रेष्ठ असून त्यानुसारच व्यवहार चालला पाहिजे हा दंडक. परिवर्तन किंवा बदलाला कोणत्याही क्षेत्रात वाव नाही.
 १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात पाश्चिमात्य पध्दतीच्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. पण समाज मनावर या चारीही वैशिष्ट्यपूर्ण दोषांचा प्रभाव इतका होता की,उद्योगक्षेत्रातही त्यांचा शिरकाव झाला. समाजाच्या विविध घटकांची मानसिकता आहे तशीच राहिली.प्रगत विज्ञानाच्याआधारावर उभारल्या गेलेल्या उद्योगांमध्ये कामाच्या विभागणीत जातिव्यवस्थेचे दर्शन घडू लागले. मालकी व उच्च व्यवस्थापकीय पदंं ब्राह्मणांच्या हातात, निम्न स्तरावरील व्यवस्थापकीय पदं मधल्या जातींंच्या हातात, तर कारकुनी स्वरूपाची कामे निम्न मध्यमवर्गीयांकडे तर कष्टाची व 'खालच्या दर्जाची’समजली जाणारी कामे खालच्या जातींकडे अशा प्रकारे कामांची विभागणी होऊ लागली.कोणताही उद्योग चालवायचा असेल तर तो गरुडाच्या पध्दतीनेच चालवावा लागतो. कासवनीती तेथे उपयोगी पडत नाही. तथापि, शतकानुशतके अंगवळणी पडलेली व्यवस्था अचानक काही वर्षांत बदलणंंही अवघड असतंं. स्वातंत्र्यानंतरही उद्योगशेत्राला या वैशिष्ट्यपूर्ण समाजरचनेचा जाच जाणवतो आहेच.
 याखेरीज नव्या तंत्रज्ञानाचं संशोधन व स्वीकार याबाबत कामगार वर्ग आणि व्यवस्थापन यांची उदासीनता, संस्थेमध्ये कामापेक्षा गटबाजी, व्यक्तिगत हेवेदावे, व्यक्तिकेंद्रित राजकारण, एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती, संस्थेच्या हितापेक्षा व्यक्तीचंं हित महत्त्वाचे मानणंं आदी प्रकार आपल्या औद्योगिक व इतर संस्थांमध्ये सहज घडत असतात, त्यात काही चुकीचंं आहे असं वाटतही नाही. हे सर्व समाजरचनेच्या प्रभावामुळेच होत आहे. त्यामुळे बुध्दिमत्ता, कर्तृत्व आदी गुण वाया जात आहेत.
 अशा परिस्थितीत समाज रचनेचा परिणाम उद्योगांवर होऊ न देणं हे व्यवस्थापकांसमोरचंं खडतर आव्हान आहे. संपूर्ण समाज बदलणं व्यवस्थापकाच्या हातात नसतं.तो समाजसुधारक असेलच असं नाही. तशी अपेक्षाही त्याच्याकडून केेलाी जाऊ शकत नाही. शिवाय तो स्वतःच या समाजरचनेचा बळी असण्याची शक्यता अधिक असतेे.अशा वेळी परिवर्तनाची सुरुवात त्याला स्वतःपासून करावी लागते आणि हेच कार्य कठीण असतंं. मात्र ते केल्याशिवाय आधुनिक काळात भारतीय उद्योगांचा पाडाव लागणं कठीण आहे.
 त्यामुळे समाजरचनेचा विपरीत परिणाम उद्योगांवर होऊ नये, म्हणून काय करता येईल याबाबत व्यवस्थापनाने गंभीरपणे विचार केला पाहिजे. कित्येक संस्थांमध्ये ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून त्याला यशही येत आहे. भारतीय उद्योगाला गरुडाचे पंख आणि चोच मिळवून देण्यासाठी आधुनिक व्यवस्थापन काय उपाययोजना करीत आहे याचा विचार पुढच्या स्वतंत्र लेखात करू.