गणपतीची आरती/दीनदयाळा गणपति स्वामी

<poem> दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी। तव चरणांची सखया मजला आवडी मोठी॥धृ.॥

कवण अपराध म्हणवुनि देवा केला रुसवा। अहर्निशी मी हृदयी तुझा करितसे धांवा॥दीन.॥१॥

चिंताकूपी पडलों कोण काढील बाहेरी। धांवें पावें सखया करुणा करुनि उद्धरी॥दीन.॥२॥

ऐसे होते चित्ती तरि का प्रथमचि देवा। अंगीकार करुनि केला कृपेचा ठेवा॥दीन.॥३॥

आतां करणें त्याग तरिही स्वामी अघटित। शरण आलों माझा आता चुकवी अनर्थ॥दीन.॥४॥

यादवसुत हा विनवी दोन्ही जोडूनियां कर॥ तव चरणाचा सखया मजला आहे आधार॥दीन.॥५॥

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg