गणपतीची आरती/वेदशास्त्रांमाजी तूं मंगल

<poem> वेदशास्त्रांमाजी तूं मंगलमूर्ती। अगणित महिमा तुझा कल्याण स्फ़ूर्ती॥ भक्तांलागी देसी विद्या अभिमत ती। मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती॥१॥

जय देव जय देव जय मोरेश्वरा। तुझा न कळे पार शेषा फ़णिवरा॥धृ.॥

पुळ्यापश्ये नांदे महागणपती। माघ चतुर्थीला जनयात्रे येती। जें जें इच्छिति तें तें सर्वही पावती। गणराजा मज बाळा द्यावी अभिमती॥ जय देव जय देव जय मोरेश्वरा॥२॥

एकवीस दुर्वांकुरा नित्ये नेमेसी। आणूनि जे अर्पिती गणराजयासी॥ त्याचे तू भवबंधन देवा चुकविसी। विठ्ठलसुत हा ध्यातो तुझिया चरणासी॥ जय देव जय देव जय मोरेश्वरा॥३॥

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg