पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/20

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मर्यादित न ठेवता सर्वांपर्यंत पोचवले पाहिजे', असे जयाप्रदाताई लिहितात.

कठीण परिश्रम

 कठोर परिश्रमाचे परिणाम नेहमीच सकारात्मक असतात. शशीताईंचा हा विश्वास होता की जे लोक कठोर परिश्रम करतात, ते कोणत्याही व्यक्तिगत किंवा संस्थात्मक क्षेत्रात यशस्वी होतात.

महिला सक्षमीकरण

 शशीताई महिलांना नेहमी प्रोत्साहित करत. त्या सांगत की ज्या महिला निर्मिती करतात, त्याच काहीतरी सिद्ध करू शकतात. शशीताईंनी सीडीएफ सोडल्यानंतर मी त्यांना एक पत्र पाठवले. त्यात मी त्यांना लिहिले “तुम्ही आकाशात चमकणाऱ्या चंद्रमासारख्या आहात. आम्ही तुमची देवीसारखी पूजा करतो. तुम्ही आमच्या जीवनातील खऱ्या देवी आहात. तुम्ही आम्हाला स्वयंपाकघरातून बाहेर आणले. आम्हाला एक दर्जा दिलात. हे आम्ही कधीही विसरू शकत नाही.” त्यांना पत्र वाचून आनंद वाटला आणि त्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत.

 शशीताई आणि श्री रामा रेड्डी, सहकार चळवळीतील दीपस्तंभच. ह्यांच्या क्षेत्रभेटी दरम्यान, शशीताई त्यांच्या गाडीत आम्हाला सोबत घेऊन जात, त्यांनी महिला व पुरुषांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. त्या नेहमी म्हणत महिलांमध्ये कोणतेही काम करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात तुम्ही पुढे राहा.

 शशीताईं नेहमीच महिलांमध्ये धैर्य व हिंमत विकसित करण्यामध्ये अग्रेसर राहिल्या. उदा. सहविकास भवन बांधताना त्यांनी एका महिलेला एका खोलीत रात्रभर एकटी झोपायची व्यवस्था केली. अशा गोष्टींमुळे महिलांची हिंमत वाढते. महिला स्वत:चा वेळ मोकळेपणाने उपयोगात आणू शकतील म्हणून ही व्यवस्था आहे असे त्या म्हणत.

 "सभासदांकडून प्रश्न आले तरच आपल्याला गटाचे प्रश्न समजतील.' जेव्हा त्या कोणत्याही महासभेला जात, तेव्हा सभेच्या अगदी मागे त्या सभासदांमध्ये बसत. त्या सभासदांच्या विचार प्रक्रियेचे निरीक्षण करीत, आणि नंतर आमच्या नजरेसमोर आणून देत. कोणताही किचकट प्रश्न असला, तरी तो कसा सोडवायचा याचे मार्गदर्शन करीत.

२०
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन