पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/26

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आली आणि शशीताईंनी लगेच बरोबर असलेल्या सहकाऱ्यांना फोन केला. मध्यरात्री त्यांना मदत हवी होती. नंतर त्यांनी इतक्या रात्री फोन करून सगळ्यांना त्रास दिला म्हणून माफीही मागितली.

 शशीताईंमध्ये एक कमतरता होती आणि ती म्हणजे, त्यांच्या आवडीनिवडी खूपच तीव्र होत्या. आणि कोणत्याही व्यक्तीबद्दल मत झाल्यानंतर ते मत बदलायला क्वचितच तयार होत असत. पण तरीही त्यांनी कामावर कधी त्याचा परिणाम होऊ दिला नाही.

 शशीताईंनी अनेकांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली. आंध्र प्रदेश महिला अभिवृद्धी संघाच्या (एपिमास) रमा लक्ष्मीताई शशीताईंबद्दल म्हणतात, “माझ्यासाठी त्या एक आदर्श व्यक्तिमत्त्व होत्या." एका दारूड्यामुळे रमाताई राजीनामा देणार होत्या, तेव्हा शशीताईंनी त्यांचे विचार बदलले. यावेळी रमाताईंनी निर्धार केला की मी पण शशीताईंसारखी जगीन. कोणामध्ये कोणत्या कमतरता आहेत, आणि त्या दूर करण्यासाठी त्या व्यक्तीला कोणत्या संधी दिल्या पाहिजे हे शशीताईंना चांगले जमत असे. रमाताईंना पुरुषांबरोबर काम करण्याची भीती वाटत असे पण शशीताईंनी ती भीती घालवली.

 रमाताईंना त्यांच्याबरोबर जवळजवळ १० वर्ष काम करण्याची संधी मिळाली. स्वनियंत्रण प्रक्रियेचा 'श्रीगणेशा' शशीताईंच्या मार्गदर्शनाखाली झाला.

 सभासदांना समजेल अशा भाषेत प्रशिक्षणाचे महत्व, स्वनियंत्रित संस्थांच्या उभारणीतून स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होते हे रमाताई शशीताईंकडून शिकल्या.

❖❖❖
२६
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन