पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/29

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 २००१ च्या जनगणनेप्रमाणे ६२ दशलक्षपेक्षा जास्त महिला, विधवा, घटस्फोटीत किंवा लग्न न केल्याने एकट्या आहेत.

 एकल महिलांना समुपदेशन करणे, त्यांची जमीन, त्यांच्या मिळकतीचे हक्क, सरकारी योजनेअंतर्गत असलेल्या हक्क वा सुविधा उपलब्ध करून देणे, जाणीवजागृतीचे कार्यक्रम आयोजित करणे, त्यांच्या प्रश्नांसंदर्भात सहभाग घेणे आणि नेतृत्व करण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणे अशी कामे संघटन करीत आहे.

 पुढे जिनीताई राष्ट्रीय पातळीवरील एकल नारी संघाच्या अध्यक्ष झाल्या. त्यांनी जमिनीचे हक्क, अन्नसुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आरोग्याचे विशेषत: कमी उत्पन्न गटातील महिलांना लाभ मिळावा यासाठी काम केले. मासिक बैठकांमध्ये धोरणात्मक मुद्दे, मानवी सन्मानाचे प्रश्न, सरकारी योजनांचा लाभ कसा मिळवावा?, त्यांना मिळालेली जमीन कायम कशी ठेवावी?, होत असलेल्या मानसिक तणावाला सामोरे कसे जावे किंवा शारीरिक लैंगिक अत्याचाराला तोंड कसे द्यावे इ. विषय घेतले.

 जिनीताईंनी आयुष्यभर आदिवासी महिलांसाठी आणि एकल महिलांसाठी केलेल्या निरंतर कामाची नोंद घेतली गेली. २००५ साली हजार महिलांची नावे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केली गेली होती. त्यामध्ये त्यांचे पण नामांकन झाले होते.

 विमेन्स वेब यांनी त्यांच्याबद्दल लिहिले - “आम्हाला त्या का प्रेरणादायी वाटतात, तर त्यांनी भारतातील हजारो महिलांच्या आयुष्यामध्ये आशा आणि मानवता जागी केली.

 महिलांविषयक असलेल्या दीर्घकालीन अनिष्ठ रूढी-परंपरांविरूद्ध प्रभावीपणे झगडण्याची ताकद दिली आणि आपले जीवन भौगोलिक सीमा आणि राष्ट्रापलीकडे काम करण्यासाठी स्वतःला वाहन घेतले.”

सुप्रभा शेषन आणि गुरुकुल बोटॅनिकल सँक्च्युअरी

 शशीताईंची नात म्हणून सुप्रभाची ओळख करून देता येईल. शशीताईंना तिच्या कामाचे कौतुक होते. सुप्रभाचे काम त्यांच्यावर आलेल्या लेखातून* समजून घेऊ या.

 केरळच्या पेरिया या गावालगत 'गुरुकुल वनश्री अभयारण्य' बहरले आहे. निसर्गसंवर्धन आणि निसर्ग शिक्षण या उद्दिष्टांसाठी ही संस्था काम करते. 'गुरुकुल'ची सुरुवात केली ती वोल्फगैंग थेऊरकौफ यांनी १९८१ मध्ये. ते जर्मनीहून भारतात आले


✽ सौजन्य : उषा:प्रभा पागे, निसर्गमैत्री (२७ वे प्रकरण), श्री विद्या प्रकाशन

२९
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन