पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/32

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गरजेनुसार सामाजिक व आर्थिक विकास करू शकतात अशा व्यासपीठ निर्मितीसाठी चालना देते.

 चैतन्यने महिला स्वयंसहाय्य गटाच्या माध्यमातून महिलांची एकजूट निर्माण केली. सुरुवातीला गट, विभाग, संघ आणि महासंघ यासारख्या स्वायत्त संस्थांची रचना उभारणी करण्यात महत्वाची भूमिका बजावली.

 सत्तावीस वर्षांपूर्वी चैतन्य संस्थेने सात गावे (चास कमान, कानेवाडी, मोहकल, कडथे, वेताळे, देवोशी) आणि १४ गटांपासून सुरू केलेले काम आज महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मध्ये सतरा जिल्ह्यातील ११६७ गावांमध्ये ४३ संघामार्फत ८,२१६ स्वयंसहाय्य गटातल्या १,१९,६१७ महिलांसोबत काम करत आहे. या सर्व संघांना लागणाऱ्या विविध सेवा आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक व्यासपीठ, एक महासंघ म्हणून सारथी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानामध्ये साधन संस्था म्हणून 'चैतन्य'ला मान्यता मिळाली आहे. त्या निमित्ताने छत्तीसगड आणि झारखंडमध्ये क्षमता बांधणीचे कार्य सुरू आहे.

 आज स्वयंसहाय्य गट व त्यांचे संघाचे काम महाराष्ट्र मध्ये सुरू करणारी अग्रणी संस्था म्हणून चैतन्यची विशेष ओळख आहे. ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक सेवा देऊन त्यांच्या क्षमता विकसित करण्याचे कार्य करत आहे. तळागाळातील महिलांपर्यंत पोचून, त्यांना बचतीची सवय लावून त्यांचे राहणीमान उंचाविण्याचा प्रयत्न करत आहे. गरीब, गरजू महिलांना व्यवसाय विकास व कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन व सल्लागार म्हणून चैतन्य काम करते.

 महिलांवर होणारे कौटुंबिक कलह, अत्याचार यांच्या निराकरणासाठी संस्थेचे समुपदेशन केंद्र आहे. संस्थेने आत्तापर्यंत अंदाजे पाच हजार प्रकरणे हाताळली आहेत.

 आरोग्य प्रश्नांवर लोकाधारित नियोजन व देखरेख प्रक्रियाही काही गावात राबवली आहे.

 ज्या महिला शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी सध्या काम सुरु आहे. शिक्षणासोबतच रोजगार, शेतीवर आधारित

३२
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन