पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/36

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जेव्हा मी शशीताईंचे सी.डी.एफ.-को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फाऊंडेशन उर्फ सहविकास (समाख्या हे त्यांचे अगोदरचे नाव) मार्फत करत असलेलं काम पाहिलं तेव्हा हे माझ्या सगळ्या निकषांमध्ये बसणारं काम आहे हे जाणवलं.

 माझे मार्गदर्शक प्राध्यापक शि. श्री. काळे आणि शशीताईंचे मार्गदर्शक श्री रामा रेड्डी हे दोघे एकमेकांना ओळखत.

 रेखाताई श्रोत्रीय आणि मी वारंगल, आंध्र प्रदेश येथील थ्रीफ्ट आणि क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वार्षिक सभेमध्ये सहभागी झालो होतो. तेथे सामाजिक कामाचे प्रत्यक्ष दर्शन घडले. गावातल्या महिला वार्षिक सभेचे संपूर्ण संचलन करत होत्या. सर्व हिशोब पारदर्शकपणे मांडला जात होता. प्रत्येकाच्या हातात वार्षिक अहवालाची प्रत होती. महिलांच्या चेहऱ्यावर उत्साह जाणवत होता. शशीताई स्टेजवर बसलेल्या नव्हत्या. तेलुगु भाषेमध्ये वार्षिक सभा चालली होती. तो प्रत्यक्षदर्शनी अनुभव प्रेरणादायी राहिला.

 , त्यामुळे आयुष्यात काय करावं याचं मार्गदर्शन करणारीमूल्यांवर भर देणारी नव्हे तर मूल्यं जगणाऱ्या व्यक्तीबरोबर नातं निर्माण झालं. एखादी आदर्श व्यक्ती कशी असावी, याचा शशीताई याचा जणू वस्तुपाठच.

माझा त्या कालावधीत लग्न करावं की नाही याचा विचार चालू होता. नाही केलं तर काय होईल ? ज्यांनी लग्न केलं नाही यांचे अनुभव काय आहेत ? तेव्हा शशीताईंनी पण लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. शशीताईंना भेटल्यामुळे मला वाटलं अविवाहितपणे जगणं शक्य आहे.

आपण कोणाला आदर्श म्हणतो तेव्हा आपण त्यांच्यातल्या गोष्टी प्रत्यक्षात करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. याचप्रमाणं मी सतत शशीताईंच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा मी हैदराबादला जात असे, तेव्हा शशीताईंच्या ऑफिसमध्ये त्यांना निश्चित भेटत असे आणि आम्ही दोघीही आपापल्या कामांमध्ये नवीन काय चाललंय ते समजून घेत असू.

शशीताईंची भेट

३० जुलै १९९४ रोजी मी सी.डी.एफ.च्या ऑफिसमध्ये भेट दिली. पध्दतशीरपणे काम चाललेलं होतं ते पाहून मला आनंद वाटला. इनवर्ड, कार्याचा आढावा तक्ता, मिटिंग रिपोर्टिंग सिस्टिम इत्यादी. जिथं एक कार्यक्षम जिवंत व्यक्ती काम करत असते

३६
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन