पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/39

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९. शशीताई आणि चैतन्य

 शशीताई राजगोपालन या गरीब गरजू लोकांसाठी, विशेषतः महिलांसाठी, त्यांच्या मालकीच्या शाश्वत, आत्मनिर्भर, स्वावलंबी, आर्थिक सेवा देणाऱ्या संस्था विकसित व्हाव्यात, या मताच्या ठाम पुरस्कर्त्या होत्या.

 शशीताई म्हणत, आपल्या देशामध्ये स्थावर वा जंगम स्वरूपाची मालमत्ता ही पुरुषांच्या मालकीची असते. दागिन्यांव्यतिरिक्त व्यक्तिगत पातळीवर स्त्रियांच्या मालकीचं महत्त्वाचं असं काही नसतं.

 स्रियांनी रचना केलेल्या, त्यांचं व्यवस्थापन असलेल्या, दीर्घकालीन चालणाऱ्या स्रियांच्या मालकीच्या संस्थांची उभारणी स्रियांनी फारशी केलेली नाही. स्थावर जंगम मालमत्ता, त्या अशा संस्थांच्या माध्यमातून धारण करू शकतात. स्वयंसहाय्य गटांमुळे स्रियांना सार्वजनिक व्यवस्थेमध्ये कार्यरत होता येते. म्हणूनच महिलांनी आर्थिक सेवा संस्थांची रचना विकसित केली पाहिजे आणि त्यांचे व्यवस्थापनही स्रियांनीच केलं पाहिजे. तसेच अशा संस्थांना व्यावसायिक दर्जा पण असला पाहिजे.

 शशीताईंनी सी.डी.एफ.च्या माध्यमातून सहकारी संस्थांची प्रारूपे विकसित करण्यावर भर दिला. आणि एपिमासच्या माध्यमातून अशा आर्थिक रचना, विशेषतः स्वयंसहाय्य गटाच्या माध्यमातून उभे राहिलेले संघ हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. या संस्थांनी आत्मनिर्भर, स्वावलंबी, शाश्वत राहण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून स्वयंनियंत्रण प्रशिक्षण पुस्तिकांचीही निर्मिती केली.

 शशीताई म्हणत, “कोणत्याही संस्थेमध्ये प्रत्येक पातळीवर, प्रशिक्षणाची नितांत

३९
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन