पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/41

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महिला स्वयंसिद्ध संघ, खेड येथील वेताळे विभाग, सखी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ, मावळमधील इंदोरी विभाग; यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ; आंबेगाव येथील माळीमळा विभाग, संकल्प ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ; जुन्नर या संघातील सत्याई विभाग या विभागांमध्ये स्वयंनियंत्रण प्रक्रिया राबवली.

 स्वयंनियंत्रण प्रक्रिया राबवत असताना चैतन्य संस्थेने खालील टप्पे निश्चित केले.

  • स्वयंनियंत्रण पुस्तिकांचे वाचन आणि आर्थिक जाणकारांची निवड
  • विभागातील सर्व गटांची सहामाही हिशोब तपासणी.
  • गटांची त्यांच्या हिशोबाची गटसभेत मांडणी व गटाच्या आरशाच्या माध्यमातून स्व-मूल्यमापन
  • विभागामध्ये सर्व गटांची एकत्रित हिशोब मांडणी व मूल्यमापन
  • गटांची व विभागांची वार्षिक सभा
  • स्वनियंत्रण प्रक्रियेचे लेखन व दस्तऐवजीकरण

 स्वयंनियंत्रण प्रक्रियेतील या प्रयोगाचे विस्तारीकरण आज चैतन्यप्रेरित विविध संघांमध्ये केले गेले आहे.

 चैतन्य संस्था, महिलांना स्वयंसहाय्य गट व त्यांच्या संघामार्फत सामाजिक सुरक्षा देते. तसेच ज्या माध्यमातून महिला आपला सामाजिक व आर्थिक विकास गरजेनुसार करू शकतात अशा व्यासपीठ निर्मितीसाठी चालनाही देते.

प्रशिक्षण व क्षमता बांधणी

 शशीताईंनी २००९ नंतर चैतन्यबरोबर संघ पदाधिकारी प्रशिक्षणामध्ये सुलभता आणली. लेखापालन या विषयावरील त्यांचे संघ पदाधिकारी सोबतचे प्रशिक्षण अत्यंत

४१
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन