पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/50

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १४. स्वयंगटामध्ये व्याज निश्चिती आणि स्थिरीकरण

 या पुस्तिकेमध्ये आर्थिक व्यवहारात व्याज कशासाठी, ठेवी किंवा बचतीवर व्याज, कर्जावरील व्याजदर, मासिक समान हप्ते, लेखा पुस्तकांमध्ये व्याजाच्या नोंदी, व्याज गणन तक्त्याची माहिती दिलेली आहे.

 १५. स्वयंसहाय्यता समूहपातळीवरील माहिती व्यवस्थापन प्रणाली

 आपल्या गटाची दिवसेंदिवस प्रगती होण्यासाठी चांगल्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवणे आणि काही चुका होत असतील तर याबाबत सभासदांना जागृत करण्यासाठी काही कल्पना या पुस्तकेत मांडल्या आहेत.

 या पुस्तकात आर्थिक विवरणपत्रांची समज व आढावा, थकबाकी आढावा आणि व्यवस्थापन, समारोप, निष्कर्ष आणि काही उदाहरणे दिली आहे.

 १६. संघ पातळीवरील माहिती व्यवस्थापन प्रणाली

 संघ पदाधिकारी म्हणून आपण वेळोवेळी सभासद, गट, विभाग यांच्या प्रगतीचा आढावा घेतला पाहिजे. त्यासाठी माहिती व्यवस्थापन प्रणाली, विभाग पातळीवर गटप्रगती आढावा, गट पातळीवर थकबाकी, विभाग पातळीवर माहिती व्यवस्थापन प्रणाली, संघ पातळीवर माहिती व्यवस्थापन प्रणाली, संघपातळीवरील अहवाल, संघाच्या वाढीची देखरेख इ. मुद्दे या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत.

 या पुस्तिकेतील साधनांचा आधार घेऊन आपण गट, विभाग आणि संघाची प्रगती पाहू शकतो. सुरुवातीला आकडे पाहून गोंधळून जाण्याची शक्यता आहे पण नंतर आपण आकडे पाहून आपल्या संघाची स्थिती ओळखू शकतो. हे ओळखल्यामुळे संघात ज्या काही हिशोबात, व्यवस्थापनात चुका होत असतील तर त्या रोखण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी आपण कार्यवाही करू शकतो आणि आपला गट, विभागणी, संघ दिवसेंदिवस प्रगती करत राहील याची खात्री देऊ शकतो.

 १७. स्वयंसहाय्य गट आणि संघ यांचा नमुना वार्षिक अहवाल

 या पुस्तिकेत स्वयंसहाय्य गटाचा नमुना वार्षिक अहवाल, संघाचा नमुना वार्षिक अहवाल त्याचे महत्त्व आणि नियामक मंडळ सभेसाठी नमुने, सूचना मांडलेल्या आहेत.

५०
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन