पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/51

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी पुढील मुद्दे दिलेले आहेत.

 संघ नमुना वार्षिक अहवाल-प्रशासकीय मंडळ/संघ पदाधिकारी, सदस्यत्व, संघातर्फे आयोजित महत्त्वपूर्ण कार्यक्रम, संघाचे लेखा पुस्तकांचे प्रमाणीकरण, मागील वर्षाच्या अंदाजपत्रकाची प्रत्यक्ष आकड्यांची जुळवणी, मागील वर्षाच्या योजनेशी प्रत्यक्ष आकड्यांची जुळवणी, निधी, पुढील वर्षाचे अंदाजपत्रक, पुढील वर्षाचा कृती आराखडा, संघाचे मूल्यमापन, सभासद स्वयंसहाय्य गटाची स्थिती, सभासद विभागांची स्थिती इ. विषयी आणि शेवटी आभार प्रदर्शन.

 १८. संघाचे वित्तीय व्यवस्थापन

 या पुस्तिकेत निधी संकलन, व्यवस्थापन, निधी संरक्षण, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या जबाबदाऱ्या, पदाधिकारी मानधन, लेखापरीक्षक नेमणूक आणि मानधन, ध्येय धोरण, मालमत्ता व्यवस्थापन हे मुद्दे यात आहेत.

 पदाधिकारी म्हणून आपल्याला आपले कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. आपण संघाच्या सभासदांच्या, समाजाच्या हितासाठी काम करू आणि सभासदांप्रती आमचे उत्तरदायित्व असेल. सभासदांनी पदाधिकाऱ्यांवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी काम करणे आवश्यक आहे.

 या पुस्तिकेमुळे स्वनियंत्रण माहितीचा प्रचार व प्रसार होईल आणि गट व संघाच्या सभासद तसेच पदाधिकाऱ्यांना त्यांचा उपयोग होईल अशी मनोमन खात्री आहे.

❖❖❖
५१
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन