पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/106

हे पान प्रमाणित केलेले आहे.


आता कुटुंबकल्याणाचे कल्याण


 बुखारेस्ट ते कैरो
 सगळ्या क्षेत्रात कुचकामी ठरलेली शासन व्यवस्था स्वतःकडे भलतीच मोठी जबाबदारी घेऊ पाहात आहे. आरोग्य आणि शिक्षण या विषयांत सरकारची काही विशेष जबाबदारी आहे, असे पंतप्रधानांनी जाहीर केलेच आहे. बरोबरीने कटुंबकल्याणातही मोठ्या प्रमाणावर हात घुसवण्याचे घाटते आहे. त्यासाठी मोठे आंतरराष्ट्रीय कारस्थान शिजते आहे.
 सप्टेंबर १९९४ मध्ये कैरो शहरी संयुक्त राष्ट्र संघातर्फे लोकसंख्याविषयक दुसरी जागतिक परिषद भरणार आहे. वीस वर्षांपूर्वी बुखारेस्ट येथे या विषयावरील पहिली जागतिक परिषद भरली त्यावेळी, म्हणजे १९७४ साली जगाची लोकसंख्या ४०० कोटी होती. दरवर्षी ती ८ कोटीने वाढत हाती.लोकसंख्येच्या या महापुरावर तोडगा काढणे हा आणिबाणीचा प्रश्न समजून बुखारेस्ट येथे त्यावर चर्चा झाली. लोकसंख्यावाढीला आळा घालण्यासाठी केवळ कुटुंबनियोजन करून भागणार नाही; व्यापक आर्थिक-सामाजिक कार्यक्रम राबवावा लागले, स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावला पाहिजे, आरोग्यसेवा सहजपणे उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि गरिबी हटवली पाहिजे असे दूरदर्शी ठराव करण्यात आले. या ठरावांचा लोकसंख्या प्रश्नावरील जगभरच्या विचारधारेवर मोठा प्रभाव पडला होता.
 लेकुरे उदंड जाहली

 बुखारेस्ट परिषदेनंतरच्या दोन दशकांत आफ्रिकेतील काही देश सोडल्यास एकूण जगातील दारिद्रयरेषेखालील लोकांची टक्केवारी कमी झाली आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने अन्नधान्याचे उत्पादन वाढले आहे. सर्वसाधारण माणसाच्या जेवणाची प्रत सुधारली आहे. स्त्रियांच्या दर्जाचा प्रश्न आता महत्त्वाचा मानला जातो. महिलाविषयक आदिसअबाबा जागतिक परिषेदनंतर स्त्रियांच्या प्रश्नाबद्दलची

भारतासाठी । १०६