पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/125

हे पान प्रमाणित केलेले आहे.

घनदाट छाया आहे.
 डोक्यावरही पांढरे केस हे मृत्यूचे पहिले लक्षण तसे बेभरवशाची महागडी वीज हे अर्थव्यवस्था कोसळण्याचे सुरुवातीचे लक्षण आहे.
 बहूपयोगी वीज
 माणसाला जे जे काही लागते ते तो श्रम वापरून निसर्गातून घेतो. त्यासाठी कल्पकता वापरतो. तंत्रज्ञान जोपासतो. आपल्या श्रमाला दुसऱ्या ऊर्जाची भर देतो. बैलांची ऊर्जा वापरतो, गुलामांची ऊर्जा वापरतो. सुसंस्कृत माणसाची सगळ्यात जास्त मदार वीज या ऊर्जेवर असते. जमीन, माणूस, पाणी आणि वीज हे माणसाच्या संस्कृतीचे आधार आहेत. वीज आणि मानवी जीवन याचा तर काही विशेष जवळचा संबंध आहे. विजेने प्रकाश मिळतो, उष्णता मिळते, चक्राकार गती मिळते, चुंबकीय गुण मिळतात. वीज हाती आली की, काय वाटेल त्या करामती करून दाखवता येतात. धबधब्यापासून वीज करणे सगळ्यात सोपे आणि स्वस्त; पण पाण्याचा हवा तसा प्रवाह तसा दुर्मिळ. त्यामुळे कोळसा. गॅस इत्यादि इंधने जाळन विजेची निर्मिती करता येते.सूर्याची उष्णता, समुद्राच्या लाटा, वाहता वारा आणि अणुशक्ती या ऊर्जास्त्रोतांचा उपयोग त्यांचे विजेमध्ये परिवर्तन करूनच प्रामुख्याने होतो. वीज हा मनुष्याच्या वेगवान प्रगतीचा सर्वात प्रमुख आधार आहे.
 विकासासाठी इतरही अनेक गोष्टी लागतात. रस्ते, लोहमार्ग, संचार, वाहतूक, वायुमार्ग, जलमार्ग इत्यादि; पण या बाकीच्या व्यवस्थांसाठीसुद्धा सगळ्यात जास्त गरज कशाची असेल तर ती विजेची.
 नियोजनजन्य बट्ट्याबोळ

 समाजवादी नियोजनाच्या काळात या सगळ्या संरचना आणि व्यवस्था तयार करणची, चालवण्याची व त्यांची देखभाल करण्याची कामगिरी शासनाकडे आली. ही कामे करण्याचा एकाधिकार शासनाने मिळवला, दुसऱ्या कोणाचा त्यात शिरकाव होऊ दिला नाही आणि परिणाम असा झाला की; या सगळ्याच व्यवस्था आता ढासळून गेल्या आहेत. आगगाड्यांची वेळापत्रके पूर्वी वर्षांनुवर्षे बदलत नसत. जाणाऱ्या, येणाऱ्या गाड्यांकडे बघून लोक आपली घड्याळे लावून घेत. आता कोणत्या तारखेची गाडी कोणत्या दिवशी निघेल हेसुद्धा खात्रीपुर्वक सांगता येत नाही. गाडीने निघालेला मनुष्य दुसऱ्या टोकाला पोचेल का नाही, पोचला तर कधी पोचेल आणि हाती पायी धड सुखरूप पोचेल की नाही याची काहीच शाश्वती नाही. वीजपुरवठ्याच्या बाबतीत परिस्थिती याहीपेक्षा

भारतासाठी । १२५