पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/166

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 महाराष्ट्रात तर जितके नेते तितके रिपब्लिकन पक्ष! अखिल भारतीय पातळीवर जबगजीवनरामांचा वारसा सांगणारे पास्वान आणि मिळेल त्या पक्षाशी चुंबाचुंबी करणारे काशीराम यांचे नेतृत्व. या परिस्थितीचा आता दलितांनाही मोठा संताप येऊ लागला आहे. अशाही परिस्थितीत दलित आणि दलितेतर याच्यात संघर्ष माजला तर दलित समाज, गत्यंतर नसल्याने आपल्यामागे येईल अशा हिशेबाने राजकारणी आराखेडे बांधून हेतुपुरस्सर बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना घडवून आणून प्रक्षोभ तयार केला गेला असण्याची शक्यता मोठी आहे. पुतळ्याच्या विटंबनेचा प्रकार घडला त्याच्या आधी तीनच दिवस एका दलित कार्यकर्त्याने दलित नेत्यांना एकत्र येण्याचा निर्वाणीचा इशारा दिला होता. अन्यथा गंभीर परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी अशी धमकीही दिली होती. आणखीही एक शक्यता आहे. काँग्रेसच्या झेंड्याखाली खानदानी क्षत्रिय व दलित एकत्र होताहेत आणि युतीच्या झेंड्याखाली सवर्ण व इतर मागासवर्गीय (OBC) यांचा एकोपा घडत आहे. या मोर्चेबांधणीतून पुतळ्याच्या विटंबनेचा प्रकार उद्भवला असण्याचीही शक्यता आहे. पुतळ्याच्या अवमानाने क्षुब्ध झालेले दलित पोलिस चौकीककडे वळले, शासनाविरुद्ध उठले आणि युतीचे शासन बरखास्त झाले पाहिजे अशा मागण्या करू लागले आणि त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या राहत्या घरांवर शिवसेनेच्या मान्यवर नेत्यांच्या नेतृत्वाखाली हल्ले झाले या घटना मोठ्या बोलक्या आहेत.
 दलित समाज युती शासनाच्या विरुद्ध खवळून उठला तर हिंदुत्वाच्या 'तुम्ही आम्ही सकल हिंदु, बंधु बंधु' या आकृतिबंधालाच तडा जातो. रामाचा अश्वमेधाचा घोडा जातो. रामाचा अश्वमेधाचा घोडा अडवण्याचे सामर्थ्य शंबुकाच्या हौतात्म्यात आहे हे सूत्र ओळखून जाणीवपूर्वक ही दंगल घडवून आणली गेली असू शकते. महाराष्ट्रातील मान्यवर दलित नेत्यांना या सगळ्या काळात दलित समाजाने धुत्कारले आणि एकदोन पुढाऱ्यांना तर लोकांच्या हातापायांचा दणका खावा लागला. याचा अर्थ, दलित समाजाच्या भावनांना हात घालून त्यांना युती शासनाच्या विरुद्ध उभे करायचे खरे; पण नेतृत्व रिपब्लिकन पठडीतील मुखंडांकडे जाऊ नये याचीही काळजी घेतली जात असावी.

 बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर सारा दलित समाज पोरका झाला आहे. दलित समाजातील एका समाजापुरती बाबासाहेबांचे नेतृत्व राहिले. त्या समाजातही पोटजातीच्या आधाराने चळवहीचे तुकडे तुकडे झाले. इतर दलित जाती आंदोलनात स्वतःचे हक्काचे स्थान मिळविण्याकरिता धडपडू लागल्या. आंबेडकरी चळळीच्या

भारतासाठी । १६६