पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/167

हे पान प्रमाणित केलेले आहे.

वारसदारांनी चळवळ त्यांना बराच काळ तगवून गेली. मराठवाडा निद्यापीठाचे नाव बदलल्यावर पुण्याच्या विद्यापीठाला असेच कोणा बहुजन समाजातील राजर्षीचे नाव देण्याची टूम निघाली. त्याबरोबरच, गावागावातील दलित वस्तीत आणि शहरातील हरेक दलित मोहल्ल्यात बाबासाहेबांचे पुतळे उभे करण्याचा कार्यक्रम दलित नेत्यांनी जाणीवपूर्वक आणि योजनापूर्वक राबवला.
 मोठ्या शहरात बाबासाहेबांचे सुबक, भारदस्त पुतळे उभे राहू शकले; गावागावात इतके खर्चीले पुतळे थोडेच उभे राहू शकणार? कोणा स्थानिक कारागीराने सिमेंटच्या मुशीत ओतून तयार केलेले निळ्या रंगातले पुतळे जागोजाग उभे राहिले. दगडावर शेंदूर ओतून स्थापलेल्या मारुतीचे भीमकाय महारुद्र हनुमंताशी काय साम्य? तितकेच साम्य या निळ्या मूर्तीत आणि युगपुरुष बाबासाहेबात रामदासांनी गावोगाव दगडांचे मारुती स्थापले कारण, त्यापरत्या सुबक मूर्ति मसुलमानी अंमलात एकसंध टिकून राहण्याची शक्यताच नव्हती. गावोगाव स्थापन झालेल्या पुतळ्यांनी एक असेच मोठे काम केले.
 मुसलमान या देशात आल्यापासून दलितांनी वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी जागोजागी इस्लामचा स्वीकार केला. त्यामुळे दलितांची दु:खे संपली असे झाले नाही. उलट, मुसलमान समाजाच्या पोटात पूर्वदलित मुसलमानांची एक अवमानित जमातच तयार झाली; पण इतर समाजाशी टक्कर घेण्याचा प्रसंग आला की धर्मांतर स्वीकारलेले मुसलमान अगदी तुर्कस्थानातून आलेल्या शुद्ध बीजाच्या मुसलमानाइतकेच ताठ्याने वागू शकतात. पाटलाच्या वाड्याच्या दारासमोरील पायरीखाली उघड्या पायांनीसुद्धा येऊ न शकणारा कालचा दलित मुसलमान झाल्यावर बूट खडाखडा वाजवीत तिथे थाटाने प्रवेश करू लागला. इस्लाम स्वीकारल्याने दलिंदर संपले नाही; पण निदान ताठ मान ठेवण्याची शक्यता मिळाली.

 बौद्ध धर्म स्वीकारल्याने दलितांच दैन्यही संपले नाही आणि अस्मिताही मिळाली नाही. ब्राह्मणी पूजाअर्चाऐवजी पीतवस्त्रधारी भीक्खूनी केलेल्या पूजाअर्चाचे स्तोम माजले. गावोगावी उभ्या झालेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यांनी दलित समाजाला एक मोठी विचित्र अस्मिता बहाल केली आहे. पुतळा उभा करायचा म्हणजे जागा ठरावी लागते. गावातील सार्वजनिक सभासमारंभांच्या स्थळी पुतळा उभारला गेला तर काही अर्थ आहे या भावनेने अनेक गावात पुतळ्यांवरून आणि पुतळ्यांच्या जागांवरून तेढ माजते आहे. गावठाणातील लोकांना कोणाचा पुतळा उभारण्याची फारशी इच्छा नाही आणि ऐपतही नाही. उलट, अनेक

भारतासाठी । १६७