पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/177

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे, यात देशाला मोठा धोका आहे.
 शेतकरी संघटनेने सेवाग्राम येथे २८ ते ३० जानेवारी १९९८ या दिवसात देशातल्या सगळ्या, फक्त शेतकऱ्यांची नाही, नागरिकांची एक जनसंसद आमंत्रित केली आहे. दिल्लीतल्या संसदेमध्ये जी चर्चा होऊ शकली नाही, ती लोकांनी करावी; एक दिवस लागो, दोन दविस का कितीही दिवस लागोत. सेवाग्रामला गांधीजींचा आश्रम आहे तिथं बसावं आणि 'स्वातंत्र्य का नासले?' आणि 'आता त्यातून मार्ग कसा काढायचा' यावर चर्चा करावी अशी ही 'जनसंसद' बोलावण्यामागची अपेक्षा आहे.
 या जनसंसदेची तयारी करताना मी जिल्हा महिला अधिवेशने आणि विद्यार्थी मेळावे घेत फिरत आहे. '५० वर्षांत स्वातंत्र्य का नासले?' या पुश्नाबद्दल तुमचं मत काय आहे, सर्वसामान्य नागरिकाचं मत काय आहे? हे ऐकणं हा यामागचा उद्देश आहे. मला पुढाऱ्यांचं मत नको आहे. मला तज्ज्ञांचं मत नको आहे, अर्थशास्त्रज्ञानीच गेल्या पन्नास वर्षात सारा देश बुडवला. म्हणून मला सर्वमासान्य माणसांचं मत हवं आहे.
 या विद्यार्थी मेळाव्यात प्रामुख्याने ज्यांचा शेतीशी संबंध आहे. ज्यांचे आईवडील शेतीवर आहेत असेच विद्यार्थी आहेत; शिक्षणाच्या निमित्ताने आर्णी, यवतमाळ सारख्या शहरात आलेली ही शेतकऱ्याघरची मुलं आहेत. त्यांना जे सांगायचं आहे ते मी १९८५ साली एका पत्रात-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पत्र-सांगून टाकलं आहे.
 प्रत्येक पक्षाची संघटना असते. ते विद्यार्थी निवडणुका लढवतात. कोणी विद्यार्थी निवडणूक लढवीत असेल तर पक्ष त्याला पैसे पुरवतो कारण यातूनच पक्षाचे नवे नेते तयार व्हावेत. मग, पक्षाने काही आंदोलन काढलं की ते विद्यार्थ्यांनाही त्यात घेऊन जातात; विद्यार्थी म्हणजे तरुण रक्ताचे, झटकन तापणाऱ्या रक्ताचे, दगडफेक करायला बरे असतात. म्हणजे फटाफट आंदोलन यशस्वी होईल आणि पक्षाचं नाव होऊन जाईल असं गणित.

 शेतकरी विद्यार्थी संघटना ही विद्यार्थ्यांना आंदोलनात यायला सांगत नाही; दगड फेकायला सांगत नाही. धोंडे फेकायला सांगत नाही. विद्यार्थ्यांचा असा वापर करणं म्हणजे पुढच्या वर्षीच्या पिकाचं बियाणं यंदाच खाऊन टाकण्यासारखं आहे असं शेतकरी संघटना मानते. मग विद्यार्थ्यांनी काय करावं असं मी त्या १९८५ च्या पत्रात सांगितलं? "विद्यार्थ्यांनी विद्या कमवावी. अभ्यास करणं हा विद्यार्थ्यांचा धर्म आहे. तो अभ्यास त्यांनी कसा करावा? शेतकऱ्याघरची मुलं

भारतासाठी । १७७