पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/183

हे पान प्रमाणित केलेले आहे.

झेंडा लाल किल्ल्यावर लागला, तुमच्या रंगाची माणसं पंतप्रधान झाली, तुमच्या रंगाची माणसं मंत्री झाली म्हणून असं वाटायला लागलं की आपल्याला स्वातंत्र मिळालं तरी पण प्रत्यक्षात सत्तेवर बसलेल्या माणसांना इंग्रजांनासुद्धा गोरगरीबांविषयी जितका कळवळा होता तितकाही नाही. इंग्रजांनी गावोगाव दवाखाने काढले, कॉलरा निर्मूलनासाठी काम केलं, प्लेग निर्मूलनासाठी काम केलं; पण तेवढीसुद्धा सहानुभूती नसलेली आमची माणसं सत्तेवर आली. तसं नसेल तर मग, धरलेल्या मार्गाची काही चूक आहे हे कबूल करून दुसऱ्या मार्गाचा शोध घेऊन त्या मार्गाने चालायला सुरुवात केली पाहिजे."

 शिक्षणासंबंधी ही अशी अवस्था आहे. तरुणांच्या मनामध्ये आजकाल नोकरीचा विषय असतो म्हणून मी एक धोक्याची सूचना देऊन ठेवतो. एक गोष्ट खरी आहे की तुमच्या आईबापांनी तुम्हाला कॉलेजमध्ये शिकायला पाठवलं ते या विचाराने की, "बाळांनो, काही करा; चांगलं शिका पण शेतीत नका येऊ. शेतकी कॉलेजचं जरी शिक्षण घेतलं तरी बँकेमध्ये जा, शेतकरी अधिकारी व्हा आणि शेतकरी अधिकारी व्हा आणि शेतकऱ्यांना शहाणपण शिकवा शेती कशी करावी याचं; पण, शेती करायला नका येऊ; याल तर मराल." आपण सगळेजण शहरात विद्यार्थी म्हणून आलो ते खरं नाही; विद्येच्या शोधार्थ आलोच नाही. आपण आलो आहोत एका कागदाच्या कपट्याच्या शोधार्थ, ज्याला म्हणतात 'डिग्री सर्टिफिकेट' किंवा 'डिप्लोमा सर्टिफिकेट' हे सर्टिफिकेट कशासाठी हवं आहे? विद्या काहीही न मिळे, पण हे सर्टिफिकेट म्हणजे, तरुणांना रोजगार देऊन बेरोजगारी दूर कशी करावी यासाठी आम्ही एक समिती स्थापन करीत आहोत, तुम्ही आम्हाला मदत करा. मी त्यांना एकच सल्ला दिला, "बेरोजगारी दूर करायची आहे? काही समिती नको, काही बजेट नको आणि काही सरकार नको. मी कोणाला हवी त्यालाएका दिवसात नोकरी देतो; फक्त एक अट आहे. तुम्ही जर का माझ्याकडे नोकरीत लागून शंभर रुपयांचे उत्पादन केलं तर त्यातले नव्याण्णव रुपये तुमचे, माझ फक्त एकच रुपया. ही नोकरीची अट ज्याला मान्य असेल त्याला नोकरी द्यायला मी तयार आहे." आपण त्या नोकरीमध्ये भाकरी काही टाकणार आहोत का? सर्वसाधारणपणे नोकरदार, मग तो दिल्लीचा असो, मुंबईचा असो, यवतमाळचा असो का आर्णीचा असो. एकदा नोकरी लागली की काम करायचा काही संबंधच नाही, दोन ओळी लिहिताच येत नाहीत, आधीच्या कारकुनाने फाईलीमध्ये जे काही मसुदे लिहिले असतील तसाच मसुदा लिहून साहेबाच्या पुढे ठेवायचा, साहेबानं म्हटलं,

भारतासाठी । १८३