पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/187

हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यक्तीचा सदाकाळ आदर्श बाळगू नका.
 अजून एक लहानसा सल्ला. जगामध्ये असं एकही पुस्तक नाही की ज्यामध्ये जगाच्या सुरुवातीपासून ते जगाच्या अंतापर्यंत सगळं शहाणपण लिहिलेलं आहे. गजनीचा महंमद आला तो वायव्येच्या एका बौद्धांच्या विद्यापीठात गेला; प्रचंड ग्रंथालय होतं. त्यानं विचारलं, "हे काय आहे?" लोक म्हणाले, "ग्रंथ आहेत." त्यानं विचारलं, "त्यात काय आहे?" लोक म्हणाले, "त्यांत पुष्कळ ज्ञान आहे." तो म्हणे, "कुराणामध्ये जे लिहिलं आहे, त्याच्यापेक्षा वेगळं आहे का? तसं असेल तर ते खोटं आहे. सगळे ग्रंथ जाळून टाका आणि कुराणात जे लिहिलंय तेच जर यांच्यात लिहिलं असेल तर या ग्रंथाची गरज काय?" असं ग्रंथालयं जाळणारे 'महंमद गजनी' आजही आपल्यामध्ये आहेत. मी जोतिबा फुल्यांचा मोठा भक्त आहे. मी स्वतःला जोतिबांचा शिष्य म्हणवतो; पण, तुम्हाला कुणाला जोतिबा फुल्यांचं मत पटत नसेल तर तुमचं मत स्पष्टपणे मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. त्या अधिकाराकरितासुद्धा मी लढायला तयार होईन. मी गांधींना मानतो, पण गांधींवर कुणी टीका केली म्हणजे त्यांचं घर जाळून टाका असं मी म्हणून कसं चालेल. मी बाबासाहेब आंबेडकरांना फार थोर माणूस मानतो; पण कोणी जर म्हणायला लागलं की, आंबेडकरांविरुद्ध कोणी लिहिलं म्हणून जाळा त्याची पुस्तकं तर समजा हा महंमद गजनीचा नवा अवतार आहे; त्याला थारा देऊ नका. कोणतंही पुस्तक मोठं नसतं. कायमचं मोठं नसतं. कुराण मोठं नाही, बायबल मोठं नाही आणि भगवद्गीतासुद्धा मोठी नाही हे लक्षात ठेवा. कारण, हे सगळे एका काळचे थोर ग्रंथ आहेत. नव्या काळाचा थोर ग्रंथ लिहिण्याचं काम तुमच्याकडे आलं आहे म्हणून तुम्हाला विद्यार्थी म्हणायचं, म्हणून तुम्हाला तरुण म्हणायचं.

 विद्यार्थ्यांचं मंडळ असतं, विद्यार्थ्यांची संघटना असते. तसं युवा संघटनांची. तरुणांची भूमिका काय असं फारजण बोलतात. असं बोलणारांविषयी मला शंका आहे. मला परवा दिल्लीला काँग्रेसच्या युवा संघटनेचे प्रमुख युवा संघअनेचा अध्यक्ष कसा काय झाला? चालतं, म्हणे! पहिल्यांदा वयोमर्यादा पस्तीस होती, हळूहळू चाळीस झाली... मी म्हटलं थोड्या दिवसांनी मीसुद्धा युवा संघटनेत येऊ शकेन! तरीही तरुण कोण आहे? मी जर १८ किंवा २१ वर्षाच्या तरुणाला म्हटलं की, "चल, समोर छान डोंगर दिसतो आहे, जाऊ या आज आपण चढायला, कठीण असला म्हणून काय झालं?" आणि तो जर म्हणाला, "नको बाबा, मी आतापर्यंत कधी डोंगरावर चढलोच नाही, चढणं जमेल का नाही

भारतासाठी । १८७