पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/191

हे पान प्रमाणित केलेले आहे.

भूकबळी, रोगराई ही मानवाची नियतीच आहे' अशा अर्थाची माल्थसची भाकिते खोटी ठरली. त्याच्या काळी जमीन हीच सर्वांत मोठी साधनसंपत्ती होती. आता जमिनीपेक्षा भांडवल, भांडवलापेक्षा तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानापेक्षा माणूस हे जास्त महत्वाचे उत्पादनाचे घटक ठरले; त्यामुळे माल्थसचे अरिष्ट टळले हा विचार अनेक शास्त्रज्ञांनी पूर्वी मांडला आहे; पण डॉ. सायमन यांना हे स्पष्टीकरण मान्य नव्हते. भांडवल आणि तंत्रज्ञान यांच्या वाढत्या वापरामुळे हे घडले असते तर प्रदूषण वाढत गेले असते. ते वाढते आहे अशीच बहुतेकांची समजूत आहे. १९६० ते १९९० या काळातील आकडेवारीने डॉ. सायमन यांनी असे दाखवून दिले आहे की, औद्योगिक प्रदूषणाची पातळी अमेरिकेत प्रत्यक्षात कमी कमी होते आहे. १९८० साली प्रख्यात जीवशास्त्री पॉल एअर्लिक आणि सायमन यांची गाठ पडली. एअर्लिकसाहेब लोकसंख्येच्या वाढीस आळा घालण्याचे मोठे पुरस्कर्ते. "लोकसंख्या कमी झाली नाही तर साधनसंपत्ती अपुरी पडेल, त्यांच्या किमती वाढतील." हे मत ते आग्रहाने प्रतिपादीत. दोघांची पैज लागली, हजार डॉलर्सची. १९९० सालापर्यंत क्रोमियम, तांबे, निकेल, टिन, टंग्स्टन या पाच धातूंच्या किमती पडताना दिसल्या तर एअर्लिक हरले म्हणायचे आणि किमती चढताना दिसल्या तर एअर्लिक जिंकले म्हणायचे. प्रत्यक्षात या दहा वर्षांत लोकसंख्या वाढली, तांब्याची मागणी वाढली; पण तांब्याचे उत्पादन अधिक कार्यक्षम झाले, अधिक स्वस्त पर्याय सापडले. एअर्लिक यांनी पैजेपोटी ५७६ डॉलर्स ७ सेंट दिले-चलनवृद्धी लक्षात घेऊन! पण त्या सोहबांचा अजूनही विश्वास आहे की, दीर्घ काळाचा अनुभव घेतला तर त्यांचेच म्हणणे खरे ठरेल.

 माणसाची सतत प्रगतीच होते, याला सायमन फक्त एक अपवाद करतात, "सर्वांत निर्णायक साधनसंपत्ती माणूस ही आहे. तो आपले मन, विचारशक्ती, प्रज्ञा, प्रतिभा वापरून परिस्थितीवर सतत मात करीत असतो. त्याला खरी गरज फक्त एकाच गोष्टीची प्रगती त्यांतील नागरिकांच्या स्वतंत्र्याशी सरळ जोडलेली आहे." साऱ्या पृथ्वीतलावर प्रगती झाली. फक्त राष्ट्र, धर्म, समाजवाद असल्या झेंड्याखाली जेथे जेथे हुकूमशाही लादली गेली, नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंधने आली तेथे मात्र प्रगतीचे चक्र मंदावले, थांबले आणि उलटही फिरू लागले, ख्रिस्तानंतरच्या १७५० वर्षांत प्रगती झाली नाही याचे कारणही हच. धर्मगुरू आणि सुलतानांनी सामान्य जनांना निव्वळ गुलाम बनवून टाकले होते त्यामुळे प्रगती थांबली. धर्माचा आणि राजसत्तेचा पगडा जसजसा कमी होत गेला तसतशी माणसाची प्रगती झाली, जीवनमान सुधारले. स्वातंत्र्य आणि प्रगती या एकाच

भारतासाठी । १९१