पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/200

हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रभावी भावना गरीब देशांत सापडते.
 सगळ्या देशाची फाळणी झाली. फाळणी झाली तो देशही इंग्रजांच्या साम्राज्यवादामुळे एका राजकीय छत्राखाली आलेला. इतिहासात इंग्रजी अंमलाखालील हिंदुस्थानसारखा देश एक अंमलाखाली कधीच नव्हता. पूर्वापारचा इतिहास पाहू गेले तर वायव्येस अफगाणिस्तानापासून तो अग्नेयेस बळीच्या बेटापर्यंत हिंदुस्थानच्या संस्कृतीची सलगता सापडते हे खरे; पण हिंदुस्थानचा राजकीय नकाशा म्हणतात तो इंग्रजांनी तयार केला. अनेकांच्या मनात भारतमातेचे असे एक मोठे सुंदर चित्र असते. काश्मिरात विपुल केशसंभार मंडित मुख. गंगायमुनेचे असे एक मोठे सुंदर चित्र असते. काश्मिरात विपुल केशसंभार मंडित मुख, गंगायमुनेच्या प्रदेशाचे बक्षस्थल, कच्छ आणि बंगालचे उजवेडावे बाहू आणि रामेश्वरी पदकमले असे चित्र अनेक कॅलेंडरवाल्यांनी काढले आहे.
 "जिचे पदकपीठ हे जन म्हणोत लंकारिते
 सुवर्णकलशापरी पदतले अलंकारिते।।"
 असले वर्णन अनेक कवीनी रंगविले आहे.
 हिंदुस्थानच्या प्रतिमेशी काही आकृतिबंधात उभ्या माणसाच्या प्रतिमेशी काही सादृश्य आहे. बाकी बहुतेक देशांचे आकार लोळागोळाच असतात. तेथील कवी राष्ट्रमातेचे चित्र कसे रंगवितात कोणास ठाऊक! ऑस्ट्रेलिया तर मला उलटा टांगलेल्या डुकराच्या आकाराचा वाटतो. इंग्लिश लोक.
 "ब्रिटानिया राज्यकरी समुद्रलाटांवरी,
 तुझे पुत्र न मानतिल कधी गुलामगिरी"
 असे अभिमानाने म्हणतात, ब्रिटानियाचे चित्रही कधी कधी पहायला मिळते; पण तिला ब्रिटिश बेटांच्या भौगोलिक आकाराच्या गोणपाटात बळजबरीने बसविण्याचा प्रयत्नही कोणी करत नाही. भारतमातेची चित्र खोल रुजण्यात नकाशाच्या आकृतिबंध इंग्रजांनी जमविला आहे. इतिहासाने नाही. त्याचीही फाळणी. लक्षावधी लोक निर्वासित झाले, दोनचार जिल्हे इकडचे तिकडे झाल्याने इतिहासाला किंवा संस्कृतीला काही तडा जाणार आहे असे नाही. विशेषतः त्या प्रदेशातील नागरिकांची एकत्र राहण्याची इच्छा नसेल तर त्यांना बळजबरीने कोंडून ठेवण्यात शहाणपणा नाही, देशभक्ती नाही आणि व्यवहारीपणा तर त्याहून नाही.

 स्वयंनिर्णयाचे तत्त्व एकदा मान्य केले असते तर बेळगावपासून काश्मिरपर्यंत सगळे प्रश्न सुटण्याला काहीच अडचण आली नसती. अशी उदारमतवादी भूमिका घेतली असती तर कोणत्याही सार्वमताचा निर्णय आपल्याविरुद्ध गेला

भारतासाठी । २००