पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/218

हे पान प्रमाणित केलेले आहे.

अ-राजकीय व्यवस्था - गांधीजींचा शासनव्यवस्थेवर विश्वास नव्हता. किंबहूना, हिंदुस्थानची स्वातंत्र्य चळवळ ही शासनव्यवस्था संपविण्याकरिता उचललेलं पहिलं पाऊल आहे असं ते आग्रहाने म्हणत असत - सगळेच मागे पडले, त्यांचे शिष्योत्तम पंडित जवाहरलाल नेहरू - कधीमधी ते सूट-टाय वापरीत असत, पण एरवी अगदी देशी, नखशिखन्त शुभ्र वेश परिधान करून आणि छातीला गुलाब लावून वावरत. गांधींनी 'सूटबूटा'ऐवजी पंचा दिला. नेहरूंची 'पंचा' संपवला. नखशिखान्त 'देशी' पण थाटदार पेहेरावाची संस्कृती आली. पंडीतजींनी गांधीपूर्व 'सूटबूटी' काँग्रेस पुनरुत्थान केले. शेतीला नाही, कारखानदारीला महत्त्व आहे; खेड्याना महत्त्व नाही, शहरांना महत्त्व आहे आणि ग्रामपंचायतीला महत्त्व नाही, केंद्रशासनाकडे सर्वांत जास्त अधिकार असले पाहिजेत अशा तऱ्हेचा विचार त्यांनी मांडला आणि त्याला समाजवादाचा नवीन झेंडा दिला, पूर्वी देश गुलाम होता तेव्हा 'स्वदेशी'ची चळवळ ठीक होती; पण आता स्वातंत्र्य आले आहे; विकासासाठी, तंत्रज्ञानासाठी परदेशांशी संबंध साधणे आवश्यक आहे; पण उद्योगधंदे, ज्ञान, तंत्रज्ञान यांना साऱ्या देशाचे दरवाजे खुले करून देता नये. अन्यथा ज्यांच्या हाती सत्ता आली त्यांच्या हाती काहीच पडणार नाही. नव्या सत्ताधाऱ्यांचा विरोध परदेशी विज्ञानाला नव्हता, तंत्रज्ञानालाही नव्हता. नेहरू तर सतत विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी बोलत असत.
 विज्ञान आणि तंत्रज्ञान देशांत यायला हवे; पण विज्ञान व तंत्रज्ञानाची ही गंगा आमच्या ओंजळीतूनच फक्त लोकांपर्यंत गेली पाहिजे, एरवी जाता कामा नये. समाजवादाच्या नावाखाली, देशाला संपन्न आणि स्वावलंबी बनवायचं आहे अशा घोषणा करत त्यांनी आपल्या देशाभोवती पुन्हा एकदा भिती घातल्या आणि सरकारने लादलेल्या 'स्वदेशी'चा अवतार झाला. परदेशातून काही आणताच येत नाही, आणायचं असलं तर त्यासाठी परकीय चलन सहज मिळू शकत नाही, रिझर्व बँकेकडे अर्ज केल्याशिवाय तीन पौंडसुद्ध मिळणार नाहीत अशी व्यवस्था तयार केली गेली.

 इथे पुन्हा एकदा बहुजनसमाजाची फसगत झाली. बहुजन समाजातली जी मंडळी काँग्रेसमध्ये गेली होती, ज्यांना अजूनही गावांमध्ये काही स्थान होती, त्यांनाही वाटू लागलं की, "समाजवादात आपलं बहुजन समाजाचे कल्याण आहे; रशियाने समाजवादाच्या सहाय्याने किती प्रगती केली, तेव्हा नेहरू जे मांडताहेत ते खरं असलं पाहिजे." त्यामुळे, त्यांनी देशामध्ये समाजवादाच्या नावाखाली जी भिंत बांधणारी व्यवस्था उभी राहिली तिला पाठिंबा द्यायला

भारतासाठी । २१८