पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/221

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुद्दा काय राहिला? मी पंजाबमध्ये गेलो आणि तिथं पाहिलं की खेड्यापाड्यामध्ये, या आधी कधीही खेड्यात तोंडसुद्धा न दाखवलेली माणसं जाऊन सांगत होती, "तुमच्या लक्षात कसं येत नाही? तुम्हाला घरचं बी वापरायची परवानगी राहणार नाही. तो 'डंकेल' राक्षस घ्ञऊन जाईल." अशा तऱ्हेची विक्षिप्त आणि विचित्र मांडणी करणारी मंडळी साऱ्या हिंदुस्थानभर फिरत होती. आजही 'स्वदेशी'चा विचार करणारी मंडळी आपल्या धर्माचं नाव घेतात. संस्कृतीचं नाव घेतात आणि "आपल्या देशाच्या संस्कृतीचे जर रक्षण करायचं असेल तर आपण 'स्वदेशी' वापरली पाहिजे, परदेशातला माल विकत घेता कामा नये, त्यावर बंदी घातली पाहिजे." अशी मांडणी करतात.
 यात कोणाचा स्वार्थ आहे? व्यक्तीचं स्वातंत्र्य हे प्रगतीची किल्ली आहे. प्रत्येक व्यक्ती ही अनन्यसाधारण असते आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळाल्यानेच त्याचं भलं होतं आणि देशाचं भलं होतं. संपूर्ण मानवजातीचं भलं होतं अशी माझी श्रद्धा आहे. हे सर्वांनी मानलंच पाहिजे असं मी म्हणणार नाही. तुमच्या मार्गाने जर का देशाचं भलं होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तो मार्ग आवश्य धरा. खुल्या व्यवस्थेला विरोध करणाऱ्या आणि 'स्वदेशी' आली पाहिजे असं म्हणणारांना आपले विचार मांडण्याचा अधिकार जरूर आहे.
 मी शेतकऱ्यांची बाजू मांडतो; कारण या देशात ७० शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांच्या जे तोट्याचं आहे ते देशाच्या फायद्याचं असणं फार कठीण आहे, असे मी मानतो. १९८८-८८ साली जेव्हा पहिल्यांदा खुलीकरणाची चर्चा चालू झाली तेव्हा सरकारी दस्तावेज, जो जागतिक व्यापार संघटनेकडे कबुलीजबाब दिला आहे की आम्ही शेतीमालाच्या भावाचं धोरण असं चालवतो की ज्यामुळे हिंदुस्थानातील शेतकऱ्याला त्याच्या निवडक १७/१८ पिकांमागे दरवर्षी २४६०० कोटी रुपये आमच्या शेतकऱ्याला बाजारपेठेत मिळाला असता त्याच्यापेक्षा ९०% भाव जास्त मिळतो. यूरोपमधील लोकांनी सांगितलं की शेतकऱ्याला ६५% जास्त भाव मिळेल असं आमचं धोरण आहे. अमेरिकेने सांगितलं की आम्ही शेतकऱ्याला ३५% सबसिडी देतो. हिंदुस्थानयने सांगितले की आमच्या शेतकऱ्याला २४,६०० कोटी कमी मिळतील म्हणजेच एकूण उत्पन्नापोटी बाजारपेठेमध्ये त्याला ते मिळालं असतं त्याच्यापेक्षा ७२% कमी मिळावे असं आमचं धोरण आहे. "आम्ही देतकऱ्यांना उणे ७२% सबसिडी देतो." असा हा हिंदुस्थान सरकारचा कबुलीजबाब आहे.

 परदेशातील माणसं म्हणजे काही मोठी दोस्त आहेत असं नाही. बहुराष्ट्रिक

भारतासाठी । २२१