पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/222

हे पान प्रमाणित केलेले आहे.

येथे येऊन आमचं कल्याण करणारे आहेत अशी खुळी कल्पना कोणी मांडत नाही; पण कल्याण करते ती स्पर्धा. बहुराष्ट्रिक एकमेकांशी स्पर्धा करतात आणि स्पर्धा, करायची असल्यामुळे, आमचं सरकार ज्या तऱ्हेचा जुलूम करण्याचा विचारसद्धा कोणत्याही बहुराष्ट्रिकांच्या हिशेबांत येणार नाही; त्यांना ते परवडणारच नाही. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी हिंदुस्थानात - आपल्या देशातील बाजारपेठेमध्ये गव्हाचा भाव ५१५ रुपये प्रति क्विंटल असताना सरकारने परदेशातून ७१० रुपये प्रतिक्विंटल भावाने आणला आणि इथल्या मंडीमध्ये ५१५ च्या भावाने विकला. असला आचरटपणा कोणी बहुराष्ट्रिक करू शकत नाही; हे फक्त हिंदुस्थानचे समाजवादी सरकारच करू शकते.
 पुन्हा एकदा गॅट आणि जागतिक व्यापारासंबंधी वाटाघाटीची नवी फेरी चालू होते आहे. ही नवी फेरी चालू करण्याआधी हिंदुस्थान सरकाने सल्लामसलतीसाठी चर्चा आयोजित केली होती; मलाही बोलावलं होतं. मी तिथं म्हटले, यावेळी आपण खुलेपणा, स्वातंत्र्य, राष्ट्रीयता असल्या गोष्टींविषयी बोलूया नको, कारण या गोष्टींची चर्चा होऊ शकत नाही. आपण आकडेवारीत बोलू. गेल्या वेळी (८६-८९) तुमची उणे सबसिडी ७२% होतो. आता किती आहे ते सांगा. त्यांनी दिलेल्या कागदपत्रावरून उजेडात आलेली माहिती सर्वांना मिळणे आवश्यक आहे.
 १९८६-८७ ते १९८८-८९ या तीन वर्षांत शेतकऱ्यांवरील उणे सबसिडी दरसाल सरासरी २४,६०० कोटी रुपये होती. १९९६-९७ चे सरकारी कागदपत्र- वाणिज्य मंत्रालयाचे सहीशिक्क्याचे कागदपत्र- जे जिनेव्हाकडे गेले आहेत त्यातील उणे सबसिडीचा आकडा आहे १,१३,७४८ कोटी रुपये आणि टक्केवी आहे उणे ८६.५.

 समजा, आपल्याला 'स्वदेशी' मानायची आहे. कोणती 'स्वदेशी' मानणार? शोषक 'इंडियाची' का शोषित 'भारताची?' डंकेल प्रस्तावावर चर्चा चालू होती तेव्हा अमेरकेतील शेतकऱ्यांच्या संघटनेचे लोक माझ्याकडे आले होते. ते म्हणाले, "जगातल्या सर्व शेतकऱ्यांनी एक व्हायला पाहिजे आणि डंकेलचा पराभव केला पाहिजे. कारण, तो शेतकऱ्यांची सबसिडी कमी करा म्हणतो." मी त्यांना म्हटलं, "तुम्हाला ३५% सबसिडी आहे म्हणून ती कमी करा असं तो म्हणतो; पण आम्हाला उणे ७२% सबसिडी कमी होण्याने आमचा फायदाच होणार आहे." मी काय म्हटलं ते त्यांना लगचे समजलं; पण तरीही ते म्हणाले, "अमेरिकन शेतकऱ्याची सगळी चंगळच चंगळ आहे असं जे तुम्हाला वाटतं ते

भारतासाठी । २२२