पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/248

हे पान प्रमाणित केलेले आहे.


पंतप्रधान 'इंडिया' विरुद्ध 'पोखरण' करणार?


 र्मदा परिक्रमा सुरू केल्याला आता तीन महिने उलटून गेले. दरम्यान, ठरलेल्या दिवसाच्या दहा दिवस आधीच अमरकंटक या उगमाच्या ठिकाणी पोहोचलो. नेमका तेथील उत्सवाचा दिवस आणि गारांसहित पाऊसही पडत होता. तेथे चार दिवस मुक्काम करून आता नदीच्या दक्षिण किनाऱ्याने परतीची मार्गक्रमणा सुरू झाली आहे. कष्टप्रद असली तरी परिक्रमा आनंददायकही आहे; वाटेत लागणाऱ्या गावावस्त्यांतील जनसामान्यांचे जीवन जवळून पाहता येते, त्यांच्या समस्यांची माहिती होते. सगळाच मार्ग निसर्गसौंदर्याने नटलेला असला तरी बाह्यजगाशी संपर्क अगदीच तुटपुंजा. रोज सकाळी संपर्काच्या या अभावाचा अनुभव येतो. रोजचे वर्तमानपत्र हाती न आल्यामुळे, नाही म्हटले तरी काही काळ चुकल्यासारखे वाटत राहते. मग कधीतरी कुठेतरी जुन्या वर्तमानपत्राचा कागद हाती लागतो तोच नजरेखालून घालून समाधान मानायचे.

 अमरकंटकला असताना समोर पडलेल्या अशाच एका कागदावरील 'इंडिया', 'भारत' हे ठळक शब्द पाहिले आणि चमकलोच. चटकन कागद हाती घेतला आणि वाचू लागलो. मध्यप्रदेशातील एक लोकप्रिय वर्तमानपत्र 'दैनिक भास्कर'च्या २४ फेब्रुवारी २००३ च्या अंकाचे ते पहिले पान होते. त्यावरील ठळक मथळा होता – "'इंडिया' आणि 'भारत' यांच्यामधील दरी मिटविण्याचा सरकारने निश्चय केला आहे," पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा. गंमत वाटली. १९७८ मध्ये मी हा शब्दप्रयोग केल्यानंतर किती लोकांनी तो वापरला! मनात आले, 'इंडिया-भारत' संकल्पनेचा स्वामित्वअधिकार ([ीळसही) १९७८ सालीच नोंदवून घेतला असता तर रॉयल्टी म्हणून भरपूर पैसे मिळाले असते आणि मग मानधन, पगार, निधी यासाठी धावपळ करण्याची वेळ आली नसती - इतक्या लोकांनी ही शब्दयोजना अनेकदा वापरली आहे. आता पंतप्रधानांनाही

भारतासाठी । २४८