या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

महायात्रा. २९५

यात्रांचे बंड वाढत आहे तें कमी होईल. उत्तेजन नाही म्हणून आपल्या प्राचीन विद्येचा लोप होत चालला आहे अशी हळहळ ऐकू येते. सदावर्ते व अन्नसत्रे ह्यांत खर्ची पडणा-या पैशाचा ओघ जर विद्यार्जनाकडे व विद्वानांच्या संभावनेकडे वळेल तर किती तरी बहार होईल ! तरी दानशूरांनी ह्या गोष्टीचा सहृदयतेने विचार करावा.

 देशामध्ये व्यापारवृद्धि किती झाली आहे हे ठरविण्याच्या साधनांपैकी प्राप्तीवरील कर व रेल्वेच्या उतारूंची संख्या ही प्रमुख होत. यात्रेकरूंच्या उपयोगाकरितां गुंतलेले सर्व भांडवल व लोक देशांतला व्यापार व संपत्ति वाढी लावतात असें ह्मणतां येणार नाही. ह्मणून तीर्थविधि व क्षेत्रविधींकडे मुंतलेल्या लोकांचे प्राप्तीवरील कर व्यापारवृद्धीचे निदर्शन ह्मणून स्वीकारता येणार नाही. तरी असला आंकडा स्वतंत्र रीतीने कळणे इष्ट आहे. उतारूंच्या संख्येबरोबरच त्यांच्या प्रवासाच्या हेतूंची वर्गवारी कळेल तर किती जणांचा प्रवास व्यापारी पेशाने झाला हे समजेल, आणि त्यावरून उतारूंच्या अवाढव्य संख्येपैकी कितीजणांच्या हालचालीची मदत खऱ्याखुऱ्या व्यापारवृद्धीला झाली ह्याचा ठाव घेता येईल. परंतु प्रत्येक उतारू कशासाठी गाडीत बसला ही चौकशी जितकी अफाट तितकीच कंटाळवाणी होईल. सबब तूर्त रेलवेने प्रवास करणाऱ्यांचे 'यात्रेकरी' 'व इतर' असे दोन आंकडे जरी वेगळाले मिळाले तरी कितींचा प्रवास धनोत्पादक होत नाही हे कळून येईल.

 सध्या धार्मिक विधींना वाणसौद्याचं, तीर्थोपाध्यायांना वाण्याचे आणि यात्रांना व्यापारी सध्याचे स्वरूप आले आहे. भरती करणा न्यांच्या युक्तन्यांमुळे महायात्रेला जाणा-या गांवढेकऱ्यांच्या संख्येचे एकसारखे वाढणारे प्रमाण लक्षांत आणले म्हणजे, हा भाग गांव-गाड्यांत घालण्यामध्ये विषयान्तर केलें असें मत होणार नाही. खेड्यांच्या यात्रांच्या मानाने महायात्रेचा संबंध गांव-गाड्याशी फार कमी येतो म्हणून हा विषय दुकानदारी ह्या प्रकरणांमध्ये न घालतां पुरवणीरूपाने घेतला आहे.

समाप्त
महाराष्ट्र यथोत्तजक समा