या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
[ १५० ]

व तें अत्युत्तम दशेस कसें येऊन पोंहोचलें या दोन्ही गोष्टींचें विवेचन करून दाखवितां येतें.
 अलीकडे मात्र सुती कापड उत्तरोत्तर थोडें थोडें होऊं लागून साळी लोकांच्या पोटांवर लवकरच पाय येण्याचीं चिन्हें दिसू लागलीं आहेत. विलायतेंतील "तीन राक्षसांपुढें " आतां आमचा टिकाव लागण्याची आशा नाहीं. यापुढें देशी मागावर काम करून पोटापुरतीही मजूरी मिळण्याचा संभव नाही. कारण लोक गरीब होत चालले. त्यांस विलायती माल स्वस्ता मिळूं लागला व साळी लोकांनीं पोट बांधून काम केल्याशिवाय तितका स्वस्ता माल यार होणे संभवतच नाहीं. विलायती कपडा गांवठी कपड्यासारखा टिकाऊ नसतो त्यामुळेंच काही दिवस साळी लोक जेमतेम पोट भरतील.

 सुताडे, झोरे, सत्रंज्या, खादी, इत्यादि ओबडधोबड किंवा जाड्या भरड्या कापडापासून तो एक सुती मलमलीपर्यंत साधें कापड या देशोत आहे. तसेंच चारखणी, सुसी, लुंगी, खेस, इत्यादि चौकडीचें कापड व. बलचषम झणजे बुलबुल पक्ष्याचा डोळा या नावानें प्रसिद्ध असलेले रंगीबेरंगी कापड, धोतरजोडे, लुगडीं, खण, इत्यादि किनारीचें कापड या सर्व तऱ्हा विणण्यांत येतात. तरी हल्लीं आपल्या देशांत सूत फारच क्वचित निघते ही शांत ठेविली पाहिजे.
 मुंबई इलाख्यांत फल्टण, कोल्हापूर, मिरज, बेळगांव, शहापूर, बडोदें, व अमदाबाद या गांवीं कधीं कधीं धोतरजोडे तयार होतात. तरी घाटी पंचा शिवाय इतर धोतरें फारशीं होत नाहींत असें ह्मणण्यास कांहीं हरकत नाहीं. लुगडीं, बांड, साड्या, खण, इत्यादि स्त्रियांस उपयोगी पडणाऱ्या जिनसा अमदाबाद, बडोदें, खंबायत, मुंबई, पुणें, येवलें, अहमदनगर, सोलापूर, बारशी, नाशीक, भिवडी, बेळगांव शहापूर, या ठिकाणीं पुष्कळ तयार होतात. तरी मधून मधून इतर गांवींही बऱ्याच तयार होतात. लुंग्या, सुस्या, खेस व इतर चौकडीचें काम सिंध, बडोदें, भडोच, व ठाणें या गांवीं विणतात. ठाणें येथील असल्या कपड्यास ठाणाक्लाथ हेंच नांव पडलें आहे, हें कापड साष्टीतालुक्यांतील व वांदरें आणि मुंबई येथील किरिस्ताव शिनार लोक पुष्कळ वापरतात. व मुंबईस साहेब लोकांची नोकरी करण्याकरितां आलेले बुटनेर लोकही याच कापडाचा पोषाख करितात. तसेंच कांहीं साहेब लोक, व हिंदु लोकांचीं शाळेंत जाणारीं मुलें हेंच कापड वापरूं लागलीं आहेत. ठाणें