आहे. लोकांच्या हातीं त्याच्या मताप्रमाणें धर्माची केवळ टरफलें राहिली होती. लोकांच्या पारमार्थिक कल्याणाची त्याला खरी कळकळ होती. तो स्वतः अत्यंत श्रद्धाळू अशा प्रकारचा सुधारक होता. पण आपले मत प्रतिपादण्यांत त्यानें कधींही कसूर केली नाहीं, स्वकीयांची भीड राखिली नाहीं. आणि अधिकाऱ्यांची जरब मानिली नाहीं. त्याच्या चरित्राचें सार हेंच आहे. वयाच्या एकेचाळिसाव्या वर्षी लग्न करूनही तो पुष्कळ मुलाबाळांचा बाप झाला. व संसारांतील निरनिराळे रस सुखानें अनुभवूं लागला. त्याला बायको फार चांगली मिळाली होती. पुढें पुढें लूथरचा आदा बऱ्या प्रकारें वाढला आणि त्यामुळे वाढल्या प्रपंचांतही त्याला दारिद्र्याची हाय पोंचली नाहीं. धर्मविषयक तत्त्वांचें चिंतन हा जरी त्याच्या मनाचा मुख्य हव्यास असला तरी मित्रमंडळीशीं हास्यविनोद करणें, अशासारखे प्रकार त्यास आवडत असत. तो गायनाचा थोडा शोकी असून बांसरी फार चांगली वाजवीत असे. व अंगीं थोडें कवित्व असल्यामुळे त्याच्या या सर्व सांसारिक सुखांना मोठी चव उत्पन्न झाली होती. तो विद्वान् होता हें खरें आहे; पण महान् पंडित होता असें मात्र नव्हे. पण मतस्वातंत्र्य हाच त्याचा जीवितहेतु होय. एरवीं पाहूं जातां तो थोडा करडा, कांहींसा संतापी व थोडा कहरी स्वभावाचा होता. असा हा युरोपांतील स्वतंत्र मतपंथाचा आद्यस्थापक सन १५३६ सालीं ख्रिस्तवासी झाला.
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१२२
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
११८