आपण केलेल्या कामाचा नाश करण्यासाठींच ही बंडाळी उपस्थित झाली आहे असें हेरून तो मोठ्या त्वरेनें आयर्लंडमध्ये दाखल झाला आणि ड्रोघेडा व वेक्सफोर्ड येथें त्यानें या बंडखोरांवर इतकें निष्ठुरपणे हत्यार चालविलें कीं, त्या प्रसंगाच्या स्मरणानें सुद्धां पुढे कित्येक वर्षे माणसें भयभीत होत होती. स्कॉटलंडचेंही असेंच झालें. एक चार्लस गेला तर तेथें कांहीं लोकांनीं दुसऱ्या चार्लसच्या नांवानें द्वाही फिरविली. पुन्हा ये रे माझ्या मागल्या, असा प्रकार येणार हे ओळखून क्रॉम्वेल स्कॉटलंड देशांत उतरला आणि डन्बार्क व वूस्टर येथें त्यानें बंडखोरांची अशी लांडगेतोड केली कीं, त्यांनीं पुन्हा माना काय वर कराव्या! वूस्टर येथें मिळविलेल्या यशासंबंधानें क्रॉम्वेल म्हणाला, "परमेश्वरी कृपेचें माप एवढे मोठें आहे कीं, माझ्या मनांत तें मावत नाहीं; खरोखर येथे अगदीं कळस झाला;" आणि हें अगदीं खरें आहे. कारण यानंतर पुन्हा त्याला तरवारीस हात म्हणून घालावा लागला नाहीं.
छें यश मिळविल्यानंतरही आपापसांतील कटकटी चालू होत्याच. नानाप्रकारच्या कल्पना, ध्येयें, योजना, संघटना सुचविल्या जात. शेवटीं पार्लमेंटच्या कांहीं तडफदार मेंबरांनीं बाकीच्यांना गप्प बसवून सर्व सत्ता क्रॉम्वेलच्या हवाली केली. 'राजशासन' लिहून काढलें व त्याच्या बळावर कॉम्वेल 'लॉर्ड प्रोटेक्टर' हें नांव देऊन त्यांनीं त्यास बहुतेक सर्व सत्ता दिली. नवे कायदे करणें व नवे कर बसविणें या कामी मात्र त्यानें पार्लमेंटसभेस विचारावें असें ठरविण्यांत आलें. हातीं आलेल्या सत्तेचा क्रॉम्वेलनें फार चांगला वापर केला. ही जी नवीन घटना बनली आहे तिला सर्व जनतेची संमति आहे असें नव्हे व म्हणून फौजेच्या बळावरच हा सर्व गाडा सुरळीत चालणार हे ओळखून, त्यानें सर्व
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१६६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१६२