पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१६६
 

बांधवांचें बरेंच करीत रहा. त्यांनी परस्परांवर प्रेम करीत राहावें, त्यांनीं एकविचारें राहावें आणि त्यांची बुद्धि कधीं भ्रंश पावूं नये असेंच तूं कर. कोणाचा कसाही अपराध असो, तीं तुझींच लेकरें आहेत; हें जें मीं तुझें थोडेंसें स्तवन केलें आहे तें येशूच्याद्वारां तुला पावूं दे आणि तुझी मर्जी असेल तर आतां मला सुखाची कायमची झोंप लागूं दे." श्रद्धाळू ख्रिस्त्याला चांगले शोभतील अशा तऱ्हेने हे उद्गार काढल्यानंतर तीन दिवसांनीं ऑलिव्हर क्रॉम्वेल मृत्यु पावला. ही गोष्ट इ० सन १६५८ त घडली.