पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१८२
 

आजपर्यंत तुरुक म्हणजे एक बंडच बनून राहिलें होतें. त्याच्या नांवाची दहशत अवघ्या युरोपखंडांत अशी बसली होती कीं, ख्रिस्ती लोकांचा जीव सारखा धाकधूक करीत असे. वर्षामागें वर्ष लोटलें कीं, तुर्काचा पाय मध्ययुरोपाकडे अधिकाधिक येत चालला असें सारखें होत होतें. कोणाच्यानें मान उंच करवेना. येवढे देशोदेशींचे शूर योद्धे खरे, पण सगळे आपापल्या ठिकाणीं चिडीचीप बसले होते. परंतु सोबेस्की यानें हा जबरदस्त टोला दिल्यानंतर मुसलमानी सत्तेच्या पसरत चाललेल्या लाटा परत वळल्या. ख्रिस्ती लोकांना जीव भांड्यांत पडल्यासारखें झालें. तुर्कांचा अंमल म्हणजे काय हें ते पहातच होते. अर्थात् ख्रिस्तीधर्म या त्याच्या पराक्रमामुळे कायम टिकला; इतकेंच नव्हे तर प्रत्येक राष्ट्रांत नवजीवनाचें वारें पुन्हा मोकळेपणानें वाहूं लागलें.
 पण सोबेस्कीसारखा धुरंधर नेता मिळूनसुद्धां पोलंडदेशाची व्हावी तशी प्रगति झाली नाहीं. कारण पोलंड म्हणजे भांडखोरीबद्दल मोठें नाणावलेलें राष्ट्र आहे. लोकांनीं जसें त्याच्या श्रमाचें चीज केलें नाहीं तशीच त्याची बायको जी मेरी तीही त्याची कीर्ति कमी करण्यास कारण झाली. तीं दोघें परस्परांस जरी अत्यंत प्रिय असत, तरी ती मोठी महत्त्वाकांक्षी आणि घरबसल्या अनेक खेकटी उत्पन्न करणारी होती. सोबेस्की हा रणांगणावर मोठा कर्दनकाळ होता; पण बायकोचा शब्द डावलणें त्याच्या मोठें जिवावर येत असे. राजा जिवंत आहे तोंच त्याच्या घरीं, गांवांत व सगळ्या युरोपभर हें राज्य आतां कोणाच्या हातीं जावें या यासंबंधानें सारखी बाचाबाच चालू होती. राजा शेवटी जिवाला कंटाळला. शरीरही त्याच्या स्वाधीन राहिलें नाहीं. सोबेस्कीचें वर्णन लंडनच्या एका उपाध्यानें केलें आहे. तें असें— 'हा राजा मोठा भला माणूस आहे, अतिशय सभ्य आहे, कोणासही त्याजकडे जाण्याची बंदी नाहीं. समरांगणा