पण त्याचें वासना-बळ जरी वाढत होतें तरी त्याचें शरीरबल क्षीण होत चाललें होतें. वास्तविक तो मोठ्या पिळदार बांध्याचा असून त्याची गर्दन, दंड, मांड्या पहिलवानासारख्या असत. त्याचे निळसर घारे डोळे अत्यंत पाणीदार असत. केस पिंगट भुरे असून ते त्याच्या वळीव मानेवर पडले म्हणजे तो एकाद्या सिंहासारखा दिसे. दाढीमिशा काढण्याचीच त्याची रीत होती. शरीरकष्ट असे त्याने कधीं जुमानिलेच नाहींत. लढाईच्या प्रसंगी शिपाई थोडे कचरत आहेत असें त्याला दिसलें तर तो क्षणभरही विचार न करतां ऐन खेंचाखेंचींत उडी फेंकीत असे. या त्याच्या उग्रपणाच्या आंतील भागांत मात्र मातृभक्तीची अशी एक नाजूक जागा होती. एरवीं लढाईच्या गर्जना चालू असल्या तरी आईच्या आठवणीनें तो विव्हळ होत असे. आणि तें साहजिकच होते. त्याच्या आईस बापानें अवमानिलें होतें, म्हणून त्याची मातृभक्ति अधिकच दृढ झाली होती. हा इकडे आल्यावर अँटिपेटरने तक्रार करून त्याला कळविलें कीं, आपल्या आईसाहेब कारभारांत उगाच ढवळाढवळ करीत असतात. हें पत्र वाचून शिकंदरनें त्याला चार समजुतीच्या गोष्टी लिहिल्या व कळविलें कीं, "माझ्या आईच्या डोळ्यांतून जर एक अश्रु निघाला तर माझें राज्य व माझा पराक्रम हीं केवळ मातीमोल होत." असो.
याप्रमाणे सर्व योजना चालू असतां त्याला थोडा थोडा ताप येऊं लागला. अगोदरच ग्रीक लोक भारी दारूबाज आणि त्यांत आतां तर तो इराणांत रहात असलेला! मग काय विचारावें? शिराजचें परम सुगंधित व मादक मद्य त्याला सोडीचना. त्यांतच ताप येऊं लागला. भोवतालच्या लोकांनी विचारलें, "आतां मागची व्यवस्था काय?" त्यानें सांगितलें, "जो समर्थ असेल त्याच्या हवालीं हें राज्य करा!" रोशन राणी गरोदर होती; पण अजून प्रत्यक्ष राजकुलीन संतान कांहींच नव्हतें. त्यामुळे तो तरी दुसरें काय सांगणार? हे वरील शब्द किती खरे
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/२७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
२२