पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
८०
 

करीत घरोघर गेले. आठ दिवस झाल्यावर तेथील पद्धतीप्रमाणे येशूची सुंता करण्यांत आली व त्याचे नामकरणही झालें. पुढें पहिला मुलगा म्हणून यरुशलेम येथील देवालयास ओहोरजत्रा करणे इष्ट असल्यामुळे सोयर सुटल्यानंतर आईबाप आपल्या मुलासह यरुशलेम येथे गेले. या शहरांत कोणी सायमन नांवाचा अत्यंत सदाचारसंपन्न असा एक गृहस्थ राहात असे. त्यास दृष्टान्त झाला होता होता कीं, 'तुला ख्रिस्ताचें दर्शन झाल्यावांचून मरण यावयाचें नाहीं'. येशूला आईबापांनीं देवळांत आणतांच या सायमननें या लहानशा अवतारी पुरुषाला आपल्या हातांत घेतलें व परमेश्वराची स्तुति केली. पुढें कांहीं दिवसांनीं पूर्वेकडील प्रदेशांतून कोणी मागी नांवाचे लोक यरुशलेम येथे येऊन बोलले कीं, 'यहुद्यांचा जो नवा राजा उत्पन्न झाला आहे तो कोठें आहे ? आम्हीं पूर्व दिशेला त्याचा तारा पाहिला व त्याला नमन करावयास आलों' हे ऐकून तेथील राजा हेरॉड फार घाबरा झाला. त्यानें मुख्य मुख्य पुजारी व बडवे यांस जमा करून विचारिलें कीं, 'मागी म्हणतात त्या येशूचा जन्म कोठें. झाला असावा?' ते म्हणाले, 'बेथलेम गांवीं. कारण, पूर्वीचें असें भविष्यच आहे कीं, वेथलेम सुभ्यांतून इस्रायल लोकांना पाळणारा अधिकारी उत्पन्न होईल'. हेरॉड यानें मागी लोकांस सांगितलें कीं, 'तुम्ही या नवीन अवताराचा चांगला शोध करा. तो कोठें आहे हें कळले म्हणजे मीही त्याच्या दर्शनास जाईन' मागींनीं त्याचें मनोगत ओळखिलें. डोईवरील तारा जाईल तिकडे मागी गेले. येशू ज्या घरांत होता त्या घरावर येतांच तारा थांबला. खूण पटून मागी घरांत गेले व त्यांनीं येशूस नमन केलें. आपले बटवे उघडून त्यांनी सोनें, ऊद व बोळ ह्रीं त्या मुलास अर्पिलीं व हेरॉड यास चुकविण्यासाठीं भलत्याच वाटेने ते आपल्या देशी निघून गेले. हेरॉडची ही दष्ट इच्छा जोसेफ व मेरी यांनी जाणून आपल्या गांवाहून मिसर