१३८ परशुरामभाऊ पटवर्धन यांचे पराक्रम. आपण भगीरथ प्रयत्नानें रचलेले मोठमोडे व्यूह भाऊंनीं व नानांनी हाणून पाडले हें पाहून तो दीर्घद्वेषी शिंदा अत्यंत संतप्त होऊन नानाशीं उ- घड उघडं वैर करूं लागला. त्या दोघांचा कलहाग्नि पेशव्यांच्या दरबारांत अधिकाधिक भडकत जाऊन एकमेकाच्या नरडीचा घोट घेण्याची त्यांनीं कड़े- कोट तयारी चालविली. शिंधानें एक ब्रिगेद पल- टण आणतांच नानाफडणिसांचा पाठराख्या परशु- रामभाऊ पटवर्धन हाही दोन हजार स्वारांनिशीं तासगांवाहून येऊन अलिजाबहाद्दराशीं टक्कर मार- ण्याकरितां दंड थोपटून उभा राहिला !! याप्रमाणे आंतल्या आंत यादवी माजून ते दोघे अहिरावण महिरावण एकमेकांवर जाऊन धड- कणार इतक्यांत 'हो, हो, शांतं पापं, शांतं पापं करीत हरिपंत फडका त्या वीरमहावीरांच्यामध्यें जाऊन पडला ! त्यानें दोघांनांही दोहींकडे करून त्यांस चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आणि तो कलहानि मोठ्या मिनतवारीनें विझवून आलेला भयंकर प्रसंग मोठ्या शिताफीनें टाळला. शिंद्याचे बेत निष्फळ होत गेल्यामुळे त्याचे प्रयत्नांत शिथिलता येत चालली. तथापि त्या दृढनिश्चयी पुरुषानें आपला बेत 'कोकालो फलदायकः या न्यायानें 7 मराठ्यांची बखर - भाग २७ कलम ५ पहा.
पान:पेशवाईतील धामधुमीचा देखावा अथवा सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांचे पराक्रम.pdf/१४५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही