या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एफलता. भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ९९ कल्पना भिन्न भिन्न विद्वानांनी चालविल्या. परंतु, खरी उपपात्त कोणती, हे समजत नसून, त्याचा थांग लागणे देखील बिलकुल शक्य नाही, असे कबूल करणे भाग पडते. • कियेक पाद्यांचे असे ह्मणणे आहे की,पहिला मानवी प्राणी भाषाविषयक अ. जो आदम त्याला शिकविण्यासाठी, न्यमते, व त्यांची नि- व भाषेचे ज्ञान प्राप्त करून देण्याकरतां, ईश्वराने प्रथमतः एक शब्दांचा कोश आणि व्याकरण तयार केले. परंतु, हे मत इबके वेडगळ आहे की, त्याबद्दलचा विचार करण्याचीच जरूरी दिसत नाहीं. मिश्र देशांतील ( ईजिप्तांतील ) एका राजाची अशी एक गोष्ट सांगतात की, त्याने दोन तान्ही मुलें जन्मतांक्षणच एका धनगराच्या स्वाधीन केली. पुढे, ह्या मुलांनी बकरांचेच स्तनपान केले पाहिजे, आणि त्यांच्या देखत एकहीं शब्द उच्चारता कामा नये, अशी त्याने त्या धनगरास ताकीद दिली, व सांगितले की, ही बालकें जो शब्द उच्चारतील तो ध्यानात ठेवून, आम्हांस लागलीच कळवावा. त्याप्रमाणे, त्याने केले; आणि त्यांनी प्रथम उच्चारलेला शब्द बीकाँस ( Beckos ) होता, असे राजास सांगितले. ह्या शब्दाचा अर्थ फ्रीजियन भाषेत भाकरी असा होतो, व त्यावरून, फ्रीजियन् ही मानवी प्राण्याची पहिली भाषा होय, असे कित्येक पाश्चात्य समजतात. तथापि, ही कल्पना किती निराधार आहे, हे वाचकांच्या लक्षांत सहज येईल. १ whewell. Indications. Dugald Stewart. Works, vol. III. P. 35.