या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११९ भाषेचे उद्गमस्थान, | आणखी एका ऋचेत, सोमाला अनुलक्षून असे झटलें || आहे की, हे सोमा, इन्द्राने तुझ्याशी सप्तसिन्धूचा प्रांत. सख्य करून तुझ्या साहाय्याने आयमनसाठी उदक निर्माण केले. त्या कारणाने, सप्तसिन्धू वाहत राहून, पाण्याची द्वारेही खुली झाली. वायुजातवतत्सोम सख्य इन्द्रो अपो मनवे ससुतस्कः । अहन्नहिमरिणात्सप्तसिन्धूनपावृणोदपिहितेवखानि॥१ (ऋ. वे, अ. ३ अ. ६ व १७. मं. ४. अ ३. सू २८-३२४). " ह्या ऋचेत नमूद केलेल्या सप्तसिन्धु ह्मटल्या ह्मणजे, प्रचंड सिन्धुनद, व झेलम, रावी, चीनाब, बियाज, सतलज, आणि सरस्वती, अशा नद्या होत. । सदरहू सर्व प्रमाणांवरून, आह्मां आर्यांची जन्मभूमि भरतखंडच असल्याचे निःसंशय होते; आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे येथूनच आह्मीं सर्वत्र पसरल्याचे अनुमान सिद्धवत् ठरते. आतां, ह्यासंबंधाने कित्येक शोधक पंडित आणि पा । श्चात्य विद्वान ह्यांचे काय म्हणणे ह्यासंबंधाने पाया आहे. याविषयीचा विचार करू. व त्य मताचा विचार. • सर्व बाजूचे दिग्दर्शन होण्याकरिता, केवळ वाचकांच्या सोईसाठीच, त्याबद्दलची तपशिलवार हकीकत थोडक्यांत देऊ. म्हणजे त्यावरून, एकंदर मथितार्थ ध्यानात आल्याने, खरी वस्तुस्थिति कशी असावी, याविषयींची कल्पना करण्यास वाचकास सुलभ पडेल, आणि विषयपरिशीलनाने ठाम मत करण्यास चांगले साधनही होईल.