या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उगमस्थान. १२३ मानतात. सबब, तद्विषयक ज्यास्त विवेचन करण्याचे येथे प्रयोजन नाहीं. अशा प्रकारे, मानवी प्राण्याच्या जन्मभूमीचा बहुमान ईडनला मिळणे शक्य नाही, असे | मानवी प्राण्याच्या । जन्मभूमीची अनेकता । व पाहून, अमेरिकेतील नाँट् आणि ग्लिडन् यांनी दुसरी एक कल्पना काढिली, व ते असे प्रतिपादन करू लागले की, पृथिवीवरील सर्व मनुष्याची एकच जन्मभूमि असणे संभवत नाहीं. अर्थात्, ती भिन्न भिन्न ठिकाणी, आणि ह्या भूतलावरील निरनिराळ्या भागांत असावी, असा त्यांचा अभिप्राय आहे. परंतु, ह्या मताला विरजण लावणारी अनेक प्रमाणे असून, पुष्कळ विद्वानांस, व ह्या विषयांत प्रवीणता मिळविलेल्या नामांकित 'विशिष्ठांस देखील, हें। विधान संमत नाहीं. प्रोफेसर झूक्लरचे असे म्हणणे आहे की, मानवी प्रालिमरिया, व पाण्याचे आदनिवासस्थान मध्य - मीर. " शियांतल्या लिमूरिया प्रदेशांतच होते. परंतु, हा प्रान्त म्हणजे, हिन्दी महासागराच्या उत्तरेस पाप्यांत बुडालेला असा प्रागैतिहासिकभूभाग आणि कल्पना सृष्टिच होय, असे विल्यम् एफ् वारेनने एके ठिकाणी १ The ablest of the works on the Preadamite Hypothesis remarks, “ The plural origin of mankind is a doctrine, now almost entirely superseded.) Warren's " Paradise Found. ' P. 54. २ नन्दनवनाचा शोध, अथवा ( Paradise found ) नांवाचे पस्तक पहा, पान. ३५.