या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उद्गमस्थान. १२५ कल्पनेप्रमाणे, मनुष्याचे आदिनिवासस्थान उत्तर ध्रुवाजवळील प्रदेशांतच असल्याचे समजतात. इतकेच नव्हे तर, तो प्रदेश पूर्वी, म्हणजे युगान्तरी केव्हांना केव्हां तरी, मानवी प्राणी, जनावरे, व वनस्पती, यांचे जीवन आणि संगोपन होण्या योग्य असे, अशी कित्येकांची कल्पना आहे. शिवाय, ह्या उत्तरध्रुवप्रदेशाला लागूनच यूरोप व अमेरिका खंड एक मेकाला जोडून, म्हणजे भूमीने सांधलेले असे. परंतु, जलप्रलयाने त्यांत स्थित्यन्तर होऊन, तो प्रदेश केवळ नाहींसाच झाला, आणि त्याचा मागमूस देखील राहिला नाही. फार तर काय सांगावें, पण, यूरोप व अमेरिका खंडांच्या दरम्यान एक प्रचंड तोयराशिच उद्भवून, ही दोन्हीं खंडे विभागली गेली, अशी कल्पना आहे. | फ्लॉमेरियनचे असे मत आहे की, हा वारिविप्लव होऊन सुमारे ४२०० वर्षे झाली असावीत; आणि ह्यानन्तरचा जलप्रलय अजमासे ६३०० वर्षांनी होणार आहे. परंतु, हे अनुमान बरोबर असल्याचे दिसत नाहीं; व अशा प्रकारचे उत्पात कोणया कारणांनी होतात, याबद्दलचे अज्ञान मोठमोठ्या भूशास्ववेत्त्यांससुद्धां कबूल करणे भाग पडते. आतां, उत्तरध्रुवाकडील प्रदेशासंबंधाने हल्लीची वस्तु स्थिति पाहिली तर, कोणाच्याही लक्षांत | उत्तर ध्रुव प्रदेशा. असे केले की तिक ची सांप्रतची स्थिति. । म असे तेव्हांच येऊन चुकेल की, तिकडे अतिशय थंड असल्याकारणाने, हा प्रदेश अगदीच सुरम्य नसून, प्राण्याचे पोषण किंवा जीवाचे १ ही वॉरेन प्रभृतींची कोटि होय, व काउंट सपोर्ट हा त्यापैकीच आहे. रा. रा. बाळ गंगाधर टिळक हे याच मताचे होत.