या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ --- भाषाशास्त्र, च्या मूल स्थितीत सामान्य बदल झाला, अथवा ती कालान्तराने परिपक्व दशेप्रत पोहोचली, एवढ्याच सबबीने ती त्या प्रथमावस्थेतील भाषेची दुहिता किंवा शाखा आहे, असे म्हणणे निराधार असून, तसे प्रतिपादन करण्यास देखील प्रत्यवाय येईल. उदाहरणार्थ, चाँसर कवीच्या वेळच्या आणि सांप्रत तद्विषयक मास- काळच्या इंग्रजी भाषेत जमीन आल्याकरितां उदाहरण. स्मानाचे अन्तर दिसून येते. इतकेच नव्हे तर, आंग्लभाषेची हल्लींची चारुता, तिचे सौंदर्य, तिच्यांतील विचारगांभीर्य, तिचे पदलालित्य, इयदि गुणांचा शतांश सुद्धा तिच्या त्या प्रथमास्थेत किंवा बाल्यदशेत, आविर्भूत झालेला नव्हता. तथापि, एवढ्याच कारणांनी, तत्कालीन आंग्लभाषेची हल्लीची इंग्रजी भाषा शाखा अथवा दुहिता आहे, असे म्हणणे जितक्या अंशाने असंबद्ध व वेडगळपणाचे होईल, तितक्याच अंशाने संस्कृत भाषेला वेदकालीन किंवा आर्यभाषेची शाखा अगर दुहिता ठरविणे होईल, अशी माझी अल्प समजूत आहे. वास्तविक रीतीने विचार केला तर, आपणांस असे आर्यभाग म्हणजे दिसून येईल की, आर्यभाषा म्हणजे संस्कृतच होय. केवळ संस्कृतच होय. किंबहुना, आर्यभाषा आणि संस्कृत हे निव्वळ पर्याय शब्दच आहेत, असेही म्हणण्यास हरकत नाही. मात्र, भेद म्हणून इतकाच की, बाल्यावस्थेत असलेली ती आर्यभाषा समजावयाची. पण, तचि पुढे सुसंस्कृत होऊन जेव्हां परिपूर्ण दशेप्रत पोहोचली, व अनेक संस्कार घडून तिच्यावर शब्द