या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उद्गमस्थान. । १५७ पश्चिम, उत्तर, व दक्षिण दिशेने सर्वत्र पसरले. मात्र, ही उत्तरध्रुवाजवळील वस्ती, तो प्रदेश पाण्याबाहेर निघून कोरडा पडल्यावरच झाली असावी, असे वाटते. आम्ही आपल्या दिविजयाच्या पताका, धन व यशऋग्वेदांतलें, व प्राप्त्यर्थ, पूर्व, पश्चिम, आणि उत्तर दिशेकडे फडकाविल्या असल्याचे, ऋग्वेदाच्या बहुतेक आरंभींच वर्णन आहे. कारण, एका ऋचेत असे म्हटले आहे की, * अहो कुशिकांनो, तुम्ही सुदासाचा अश्व संपत्तीसाठी मोकळा सोडा; म्हणजे, इन्द्र त्याचे संरक्षण करील; व पूर्व, पश्चिम, आणि उत्तर दिशांकडील शत्रूस मारून ते प्रांत निर्भय ठेवल; व असे झाल्याने, प्रथिवीच्या अत्युच्च स्थानीं यज्ञ करण्यास आपणांस हरकत येणार नाही." - उष प्रेत कुशिकायेतयध्वमवं राये प्र मुंचता सुदासः । राजा वृत्रं जंघनत्प्रागपागुदगथा यजाते वर आ पृथिव्याः ॥ ११ ॥ (ऋ.वे. अ.३. अ. ३ व. २१. मं. ३ अ.४. सू.५३. २८७). | अशा प्रकारे, आम्ही आर्यावर्त्ततन चारही दिशेने सांप्रतचें. चाहोंकडे पांगल्यावर, कालाच्या अनन्त घडामोडींत, प्रचंड जलप्रलय एकाएकी झाला; आणि त्या कारणाने सर्वत्र वाताहात होऊन, पुष्कळच स्थित्यन्तर घडून आलें. ह्या जलविप्लवांत, असंख्य प्राण्यांची हानि झाली; अगणित जीवजंतू वाहून गेले; व कोटयावधि प्राण्यांवर १ भारतीय साम्राज्य, पूर्वार्ध. पु. ६. भा० ३७, पान १६२ ते २०० पहा. २ ह्याचे खरे कारण शास्त्रज्ञांस देखील कळत नाहीं. ( Paradise Found. P. 75. Varren. 1893. ). | १४