या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाषाशास्त्र.



केवळ प्रमाणासिद्धच असल्या पाहिजेत, अशी आमच्या आर्यपूर्वजांची समजूत असे. सबब, ते नेहेमीं काळजीपूर्वकच यज्ञमृत्तिका लावीत, आणि मोठ्या टापटीपेनेंच स्थंडिलें तयार करीत. त्यामुळें, प्रमाणाची जरूर पडून, सूक्ष्ममापन देखील त्याच वेळीं पहावें लागे. अशा स्थितींत, भूमिमापनाचा बीजांकूर सहजीं रोवला गेला, व त्याचाच पुढे वृक्ष बनून भूमितिशास्त्र ह्या भरतखंडांतच उदयास आले.

 क्षात्र बुद्ध, व प्रबुद्ध बुद्ध.

 सुप्रसिद्ध बुद्ध, जो गौतम या नांवाने सर्वांस महशूर आहे, त्याला एकाएकी विरति प्राप्त झाली; व तीही एका वृद्ध मनुष्याची गलितावस्था, दुसऱ्या एकाची दुःखद स्थिति, आणि तिसऱ्याचें विशीर्यमाण प्रेत पाहून झाली. परंतु, ह्या केवळ सामान्य गोष्टीचाच परिणाम इतका कांहीं बलवत्तर, विलक्षण, अतर्क्य, व अदृष्टपूर्व झाला कीं, त्यामुळे बौद्धधर्माची एकदम स्थापना होऊन, त्याचा प्रसार बहुतेक आशिया खंडांत सर्वत्र झाला.

 श्रीशिवाजी हा लहानसा जहागीरदारच होता. तरी


 १ एलफिन्स्टन् कृत हिंदुस्थानचा इतिहास; व भारतीय साम्राज्य. पूर्वार्ध. पु. ४ थें. पान ९६ ते १०२ पहा.

 २ बुद्धाचे चरित्र; बौद्धधर्म; व भारतीय साम्राज्य, पु. ७ वें, पान १३९ ते १७६ पहा.

 हा धर्मप्रसार यूरोपखंडांतील व्होल्गा नदीपासून तों तहत पूर्वेकडील चीनसमुद्र, व त्याच्याही पलीकडे स्थीरमहासागरापर्यंत झाला होता.

 ३ आंग्ल व पाश्चात्य इतिहासकार ह्याला पराक्रमी शिवाजी, आणि महाराष्ट्र साम्राज्याचा संस्थापक म्हणतात.

 ( Shivaji, the Great, and founder of the Maratha Empire ).