या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ भाषाशास्त्र. जे भरतखंड, त्याच्याच पादपीठाशी प्रथमतः धांव घेऊन, तेथूनच प्रारंभ केला पाहिजे. कारण, आर्यावर्त हेच मानवी प्राण्याचे आदिनिवासस्थान असल्याविषयी अनेक प्रमाणांवरून दिसत असून, त्याबद्दलची सम्यक् कारणे व पाश्चात्यांचे अभिप्राय देखील पूर्वी दिले आहेत. इतकेच नव्हे तर, शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा तेच सयुक्तिक आहेसे वाटते. आर्यावर्त्त हा शब्द आर्य + आवर्त्त, या दोन शब्दां पासून झाला असून, त्याचा अर्थ आर्यावर्त्त. यावतं. आयचे निवासस्थान असा होतो. ३ निवासी अम आर्यभूमि व आर्यदेश हे याच अर्थाचे शब्द होत. आर्यावर्ताचा उल्लेख मनुस्मृतिकारांनी केला आहे, आणि त्यांत त्यांनी ह्या देशाची मर्यादा सुद्धा स्पष्टपणे कळविली आहे. आसमुद्रात्तुवै पूर्वादासमुद्रात्तु पश्चिमात् ।। तयोरेवान्तरं गिर्योरायवर्त्त विदुर्बुधाः ॥ २२ ॥ ( मनुस्मृति. अ० १.) शिवाय, आर्यावर्त म्हणजे आयचीच खास जन्मभूमि असून, येथे ते वारंवार उत्पन्न होतात व उदयास येतात, असे कुल्लक भट्टाचार्यांनी आपल्या मनुस्मृतीवरील टीकेंतही ध्वनित केले आहे. कारण, ते म्हणतात, 4 आर्या अत्रावर्तन्ते पुनःपुनरुद्भवन्तीत्यार्यावर्तः। आर्यावर्ताला भरतभूमी देखील म्हणतात, व भरतांचा १ मार्गे पान १२७ व १५६ ते १५८ पहा. लेंगच्यामतें ईजिप्त ( मिसर ) देशच पुराणतम होय. परंतु, त्याच्या प्रतिपादनास बलवत्तर असा कांहींच आधार नसून, शाकीय विचाराने देखील ती गोष्ट शाचीद ठरत नाही. आणि ह्मणूनच त्यांचे ऋणणे केवळ एकदेशीयसेंच भासतें., .. .