या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सामान्यविवेचन व दिग्दर्शन.

श्रीशिवाजी व महाराष्ट्र साम्राज्य.

तो पुढें छत्रपति झाला, व त्यानें महाराष्ट्र, साम्राज्याची स्थापना केली.

बाळाजी विश्वनाथ व दिल्ली तक्ताची सामन्तता.

 बाळाजी विश्वनाथ हा सातारच्या गादीजवळ प्रथमतः एक लहानसा कारकूनच होता. तथापि, त्यानें आपल्या शहाणपणाने, बुद्धिप्रभावानें, आणि राजनिष्ठनें पेशवाईचीं वस्त्रे संपादन करून, चौथाई-सरदेशमुखीच्या मिशानें दिल्लीच्या दरबारांतूनही खंडणी वसूल केली, व महाराष्ट्र साम्राज्याचा ध्वज चोहोंकडे फडकाविला. इतकेंच नव्हें तर, त्याची कला शुक्लचन्द्रमाप्रमाणें चढती राही अशी त्यानें आपली अक्कल हुशारी लढविली, आणि दिल्लीच्या पादशहास महाराष्ट्राधिपतीचा सामन्त बनविलें.

फलाचे पतन, व न्यूटनची कल्पना.

 झाडावरील फळ जमिनीवर पडतांना पाहिल्यानंतर, न्यूटनच्या मनांत गुरुत्वाकर्षणशक्ती ची कल्पना आली, व त्यानें ही सर्व व्यापकशक्ति नवीनच शोघून काढिली.


 १ जन्मकाल इ. स. १६४२.

 २ असे यूरोपस्थांचे म्हणणें आहे. परंतु, वस्तुस्थिति याहून खचितच अगदीं भिन्न आहे. कारण, ही गुरुत्वाकर्षणशक्ति, न्यूटनच्याही पूर्वी, आमच्या पूर्वजांस, किंबहुना ऋक्कालीन ऋषींस देखील, सुमारें दहा अकरा हजार वर्षें माहीत होती; आणि त्यानें काढिलेले नियमसुद्धां त्यांस अवगत होते.

 ऋगवेद, भारतीय साम्राज्य, पु. ४ थे, पान ७२-८३, व Sir W. Jones, पहा.

 He ( Sir William Jones ) ventures to affirm that "the whole of Newton's Theology, and part of his

( पुढे चालू )