या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्यनामधेयाची सार्वत्रिक मुद्राः । १७३ उल्लेख वेदांत ठिकठिकाणी केल्याचे आढळून येते. ह्या भरतभूमीलाच आर्यावर्त असे नामधेय पडले. कारण, आम्हां भारतीयांचे अगदी पहिले, जगद्वन्द्य, आणि जग विख्यात नांव म्हटलें म्हणजे आर्य असून, आर्यांचे जे निवासस्थान ते आर्यावर्त्त, अशा समजुतीने हे अन्वर्थ अभिधान प्रचारांत आले असावे, हे उघड आहे. आतां, आर्य, आर्यावर्त्त, इत्यादि अनेक शब्दांचे कसकसे स्थित्यन्तर, स्थलांतर, व रूपांतर झालें, शब्दाचे रूपांतर. त्यांनी कोणकोणत्या देशांत किती दूरवर पर्यटन केले, आणि नानाविध देशांत त्यांचे घटकावयव कशा रीतीने बदलत गेले, याबद्दलचा थोडक्यांत विचार करू. आमच्या जन्मभूमीत, म्हणजे आर्यवर्तत, किंबहुना आर्यशब्द. सकल मानवी प्राण्याच्या ह्या आदिनिवासस्थानांत, आम्ही आपल्यांस आर्य म्हणवीत असू. अर्थात्, आमच्या चाली रीतीचे, व आम्हांप्रमाणे आर्यांच्या सनातन धर्मावर विश्वास ठेवणारे मात्र, ह्या श्रेष्ठ अशा आर्यपदवस पात्र असत; आणि धर्मभ्रष्ट किंवा पतित झाल्यामुळे, जे आमच्या यज्ञयागांचा विध्वंस करीत, ते आमचे शत्रू बनल्याकारणाने, त्यांस आमच्या कळपा बाहेरचे व कमी दरज्याचे समजून, आम्ही त्यांजला दस्यू असें नामधेय दिले होते. १ ऋग्वेद. (अ ३. अ २. व १४. मं ३. अ. ३. सु. ३३-२६७). २ कर्तव्यमाचरनकार्यमकर्तव्यमंनाचरन् । तिष्ठात प्रकृता चारे सवा आर्य इतिस्मृतः ।। ३ भारतीय साम्राज्य. उत्तरार्ध. पु. ८ भाग २६. पान १९२ ब . भा. सा. उ. पु. ९ भाग ५२ वा पहा.