या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाषाशास्त्र.



झांकणाची गति, आणि वाफेच्या शक्तीची कल्पना.

वॉटची कल्पनाशक्ति अशाच मासल्याची होय. कारण, चुलीवर ठेविलेल्या आधणाच्या पाण्यानें गति प्राप्त होते, आणि भांड्यावर घातलेलें झांकण हालते, ही गोष्ट लक्षांत धरून, वॉट्नें वाफेची शक्ति व बाष्पयंत्र शोधून काढिलें.

 अशी अनेक उदाहरणे दाखवितां येतील. परंतु, केवळ विस्तारभयास्तव, त्या सर्वांचा तपशील येथे देता येत नाही.

 अस्तु. तात्पर्य म्हणून इतकेंच कीं, अल्पारंभांतच महत्कार्य प्रच्छिन्न असतें, व त्याचप्रमाणें भाषाशास्त्राचें देखील होय, हे विशेष रीतीनें सांगावयास नलगे.

भाषाशास्त्राची शैशवावस्था.

 भाषा हा निःसंशय एक मनोवेधक, प्रगल्भ, आणि महत्वाचा विषय आहे. इतकेंच नव्हे तर, तें एक शास्त्र आहे, असेही म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं. ज्याप्रमाणें, वैद्यकीय विवेचन शास्त्रीय रीतीनें करता येतें; अथवा जसे रसायनशास्त्राचे नियम केवळ ठरीव प्रमाणानेंच सांगता


( मागील पृष्टावरून पुढे चालू )

philosophy, may be found in the Vedas, which also abound with allusions, to the force of universal attraction" ( vol. III. P. 246. Vol. XXIX P. 158 ).

सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. ( ग्रंथकर्ता. )

 १. तथापि, वॉट् जन्मण्यापूर्वी, व इ.स. च्या अगोदर हजारों वर्ष, आम्हां-भारतीयांस वाफेची शक्ति माहित असून, आम्ही अग्निरथही चाळवीत असूं, असे रामायण व महाभारतावरुन चांगले व्यक्त होतें. ( ग्रंथकर्ता.)