या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्तर. आर्यनामधेयाची सार्वत्रिक मुद्रा. १८३ पूर्वेस गेले, व तेथे त्यांनी आपले राज्य चालविलें. कांहीं दक्षिण दिशेनें मॉरिशियस आणि आफ्रिकाखंडाच्या पूर्व किना-यावर उतरले, व तेथे त्यांनी आपली वसाहत केली. आणि कित्येकांनी आपला मोरचा पश्चिमेकडे फिरवून, ते तांबड्या समुद्रात शिरले. इतकेच नव्हे तर, मिसर (ईजिप्त) देशांत जाऊन, तेथे त्यांनी आर्यांचे साम्राज्यही स्थापिलें. असो. ईजिप्त देशाला प्राचीनकाळीं मिसर देश म्हणत व तेथे झालेले सं- असून, मिसर हा मिश्र शब्दाचा के स्कृत शब्दांचे रूपा-वळ अपभ्रंशच होय. मित्र म्हणजे | थोर किंवा, सद्गृहस्थ होय; व हा शब्द आर्य लोक आपणांस लावीत, आणि आपणांस आर्यमिश्रही म्हणवीत. अर्थात्, मिश्रलोकांनी (म्हणजे आर्यांनीं) जिंकलेला देश तो मिश्र देश असून, मिश्र देशाचाच मिसर देश हा अपभ्रंश आहे, यांत तिळभरही शंका नाहीं. मिश्र देशांत, मिनीस व रामास असे दोन मोठे बलाढ्य | राजे प्राचीन काळी होऊन गेले. पण मिश्र, मनु, व राम, हे देखील आमच्या आर्य पूर्वजांचेच यांचें स्थित्यन्तर. वंशज असन, पौराणिक मिसर देशांत आमच्या आयांची वसाहत, त्यांचे वर्णाश्रम धर्म, आणि त्यांची पवित्र पुस्तकें, ही सर्रास्त प्रचारात असल्याचे अनेक प्रमाणांवरून व्यक्त होते. फार तर काय सांगावें, पण मिनीस व - गणमास ही केवळ मनू आण राम यांचीच रूपान्तरें व / अपभ्रष्ट झालेली नांवें होत, हे कोणाच्याही लक्षांत सहज येण्यासारखे आहे. १ Royal Asiatic Society. vgl. XVI.