या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. १९९ : रख्या अनेक भाषाकोविदाला देखील कबूल करणे माग पडले. कारण, त्याने प्राक्कालीन संस्कृतभाषेच्या इतिहासांत असे स्पष्टपणे लिहिले आहे की,

  • There are some discussions in the beginning of the Nirukta which are of the highest interest with regard to Etymology. While in Greece the notions of one of her greatest thinkers, as expressed in the Ciatylus represent the very infancy of Etymological science, the Brahmans of India had treated some of the vital problems of Etymology with the २tpost sob7detu.

( Muller's Ancient Sanskrit Literature .) वाचकांच्या लक्षांत असेलच की, सामान्य जनास वेदाचा अर्थ सुलभ रीतीने कळावा यासाठी, निरुक्ताचें सामान्य निघंटु नांवाचा कोश तयार करविवेचन. ण्यांत आला होता. यास्कांनी सुद्धा ती गोष्ट कबूल करून, त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या निरुक्तांत केला आहे. समाम्नायः समाम्नातः सव्याख्यातव्यस्तमिमंसमाम्नायं निघंटवइत्याचक्षते । (निरक्त.१.१.). इतकेच नव्हे तर, निरुक्ताचा हेतु देखील वेदांतील मं. त्रांचा अर्थ चांगल्या प्रकारे व्यक्त करून त्यांचे दुर्बोधत्व नाहींसें व्हावे, इतकाच असल्याबद्दल त्याचे स्पष्ट वचन आहे. १ पवित्र वेद एकत्र करून जी त्यांची व्याख्या झाली, तिला निघंटु अशी संज्ञा आहे, इतकाच सदरहू संहितेचा अर्थ होय.