या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न ३०९ चंड बुद्धीचा मनुष्य असल्याकारणाने, त्याच्या मतिप्रकषाची जेवढी म्हणून तारीफ करावी तेवढी थोडीच. कारण, सर्व भाषांचे मूळ व्याकरणच असल्याने, एकंदर शब्दांचे शास्त्रीय विवेचन, त्यांची व्युत्पत्ति, त्यांचे नियमन, व तद्विषयक संक्षिप्त विवरण, इत्यादि याने इतक्या पूर्णत्वाने आणि व्यापकतेने केले आहे की, त्याबद्दलचे कुतूहल, ह्या प्रस्तुतच्या एकोणीसाव्या शतकांत ही, यावत् पौरस्त्यांस व पाश्चात्यांस वाटून, ते साश्चर्य तोडांत बोटेंच घालतात. ह्या जगद्विख्यात पाणिनीने आपल्या अष्टाध्यायींत संस्कृत भाषेची अमूल्य सेवा फारच अष्टाध्यायी, व मार्मिकपणाने आणि आश्चर्यकारकतिचे महत्व. तिच हवः तिने केली आहे. इतकेच नव्हे तर, २५ ह्या अपूर्व भाषेचे नियमन त्याने अवघ्या ३९८३ सूत्रांत करून, अज्ञानजन्य मतिभ्रमाचे सर्वथैव निरसन करण्याचा जणु काय विडाच उचलल्याप्रमाणे, त्याने हाती घेतलेले काम पूर्णपणे शेवटास नेलें आहे. येनधौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः ।। तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनयेनमः ॥ पाणिनीच्या अष्टाध्यायी रूपी अत्यन्त मनोहर, विचित्र, विस्तीर्ण, आणि भव्य मंदिराविषयीं, पृथिवीवरील प्रत्येक राष्ट्राचा अभिप्राय केवळ सानुकूलच असणे, अगदीं साहजीक आहे. कारण, संपूर्ण माहितीने भरलेला असा व्याकरणविषयक ग्रंथ पाणिनीच्या अष्टाध्यायी खेरीज, अखिल जगतलावर कोठेही नाही. शिवाय, शब्दव्युत्पत्तीच्या संबंधाने तर, हींत अगदी अप्रतीम व साद्यन्त विवेचन केलेले दृष्टीस पडते, धातुव्य