या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३६ भाषाशास्त्र, ह्याच वेळचा असल्याचे दिसते. काशिकावृत्तीवर देखील पदमंजरी नांवाची हरदत्ताने टीका केली आहे. गयादित्य हाही वामनाच्याच वेळचा मोठा वैयाकरण होय, व त्याची फारच अचाट बुद्धि असे, अशी लोकांत प्रसिद्ध आहे, वृत्तिसूत्र ही गयादित्याचीच कृति असल्याचे सांगतात, भट्टोजी दीक्षित हा इ. स. च्या सतराव्या शतकांत उदयास आला होता, व सिद्धान्तकौमुदी ही त्याची जगद् । विख्यात कृति होय. ह्याने पाणिनीची सर्व सूत्रे पद्धतशीर लावून, त्यांची अवचीन रीतीस अनुसरून पूर्ण व्यवस्था केली आहे. लघुकौमुदी हा सुद्धां सर्वमान्य ग्रंथ असून, तो वरदराजाने आशुबोधार्थ तयार केला असल्याचे दिसते. मध्यकौमुदी आणि मध्यमनोरमा ह्या देखील याच्याच कृती होत. । ह्याशिवाय, हरिकृत वाक्यपदीय, उज्ज्वलदत्तकृत उणादिसूत्रवृत्ति, वर्धमानकृत गणरत्नमहोदधि, शान्तनवकृत फिट्सूलें, इत्यादि ग्रंथही सुप्रसिद्ध आहेत. पाणिनीच्या व्याकरणपद्धतीहुन ज्यांची परिपाटी व विचारसरणी अगदी भिन्न आहे, असेही कित्येक वैयाकरण येथे होऊन गेले. सबब, त्यांजबद्दलची देखील थोडी शी हकीकत येथे देत. वोपदेव हा फारच स्वतंत्र विचाराचा वैयाकरण होऊन गेला. हा इ. स. च्या तेराव्या शतकांतला असून, त्याची मुग्धबोध नांवाची कृति सर्वस महशूर आहे. अनुभूति| १ ही उणादिसूत्रे शाकटायनाची असल्याविषयी वेवरचे मत आहे. ( I. I. L. P 226).